Raj Thackeray controversy Sarkarnama
कोकण

Raj Thackeray Controversy : राज ठाकरेंवर टीका महागात! मनसे आक्रमक; गुणरत्न सदावर्तेंना ‘बिना कपड्याचं’ फिरवण्याचा इशारा

Gunaratna Sadavarte statement controversy details: मराठी भाषेच्या मुद्यावर राज ठाकरेंवर टीका करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंविरोधात मनसेचे अविनाश जाधव यांन मिरा भाईंदरमधील पोलिसांकडे तक्रार दाखल करत इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

MNS vs Sadavarte latest news: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा चालकांना मराठी सक्ती केली असून, त्याची एक मे रोजी पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत करत, राज्यातील सर्वच वाहनधारकांना मराठी अनिवार्य करावी, अशी मागणी केली.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी यावरून राज ठाकरेंसह मंत्री सरनाईक यांच्यावर टीका केली. ठाकरेंवरील टीकामुळे मनसे सैनिक संतप्त झाले असून, अ‍ॅड. सदावर्ते यांना घरात घुसून, बिना कपड्याचा फिरवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापलं आहे.

मिरा भाईंदरमधील नवघर पोलिस ठाण्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून, मनसे (MNS) नेते अविनाश जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे. अविनाश जाधव यांनी यावर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर एकेरी हल्ला चढवला.

अविनाश जाधव म्हणाले, "गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) नावाचा एक टुकार माणूस आहे. हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ठिकठिकाणी जातो. मराठी भाषा आणि मराठी नेत्याबद्दल सतत वाईट बोलतो. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे. या गृह खात्याने सदावर्तेला आवरलं पाहिजे. आमचा संयम संपला आहे."

एक दिवस असा येईल की, सदावर्तेला बिना कपड्याने फिरवलं जाईल. सदावर्ते याच्यावर जर कारवाई झाली नाही, तर आम्ही त्याला धोपटल्याशिवाय राहणार नाही. मराठी आंदोलकांनी जसं त्याला घरात घुसून मारलं होतं, तसं आम्ही घरात घुसून मारण्याची वाट पाहतोय का? असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी केला.

जर गृह खात्याने त्याला समजावलं नाही, तर आम्ही लाथा बुक्क्याने त्याला समजावू. जर एका बापाची औलाद असेल, तर त्यानं 4 मे रोजी मिरा-भाईंदरमध्ये यावं, असं आव्हान अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना दिलं आहे. सदावर्तेंच्या विरोध नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल होऊन, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असेही अविनाश जाधव यांनी म्हटलं.

ठाकरेंची झाकरी नाईकशी तुलना

राज ठाकरेंवर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी, त्यांची झाकीर नाईकशी तुलना केली. राज ठाकरे झाकीर नाईकांसारखे बोलतात आणि भाषेच्या नावावर देश तोडण्याचे काम करत आहेत, असा आरोप केला. सदावर्ते यांनी राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करताना, अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली.

वैचारिक दिवाळखोरीचा टोला

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे, यांना वैचारिक दिवाळखोर म्हटले असून, त्यांची भाषा अतिरेक्यांसारखी असल्याचे टीका केली. पावसाळ्यात बेडूक डराव-डराव करतात, तसे राज ठाकरे निवडणुका आल्यावर येतात, असे म्हणत त्यांनी 'सीझनल' राजकारणावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT