Maharashtra Cabinet Reshuffle : सत्ताधारी महायुतीत, खाते पलटीची चर्चा? चंद्रशेखर बावनकुळेंकडील 'महसूल' राष्ट्रवादीला? आदिती तटकरे थेट म्हणाल्या...

Maharashtra government reshuffle who gets which ministry : राज्यातील सत्तेत असलेल्या महायुती सरकारमध्ये खाते पटली होण्याबाबत चर्चा असून, मंत्री आदिती तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Cabinet Reshuffle 2026
Maharashtra Cabinet Reshuffle 2026Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Government Portfolio Change: राज्यात महायुती सत्तेत खाते बदल होण्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडचे अर्थखाते भाजपकडे आले. याबदल्यात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे संभाळत असलेले महसूल खाते हे, अजित पवार राष्ट्रवादीला देण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री आदिती तटकरे यांना यावर प्रतिक्रिया देताना, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील, असे म्हटले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "अर्थखात्याच्या बदल्यात, अजित पवार राष्ट्रवादीला (NCP) महसूल खाते मिळणार असल्याचे हे मी पहिल्यादांच ऐकत आहे. अजितदादांच्या निधनानंतर, त्यांच्या पश्चात लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून, अर्थ खाते स्वतःकडे घेत, अर्थसंकल्प सादर केला."

'अर्थ अन् महसूल खाते बदलाची चर्चा असेल, तर याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. महायुतीमध्ये अर्थ खात अजित पवार यांच्याकडे होते, या खात्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. आज सुनेत्रावाहिनी आहेत, त्यांच्यावर अधिकच्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी दिली, तर आनंद होईल,' असेही आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी म्हटले.

Maharashtra Cabinet Reshuffle 2026
Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

अजितदादाच्या पश्चात सुनेत्रावहिनींनी पक्षाची जबाबदारी संभाळली आहे. पार्थ आणि जयदादा हे पक्षाचे संघटन त्यांच्यापद्धतीने संभाळत आहेत. त्यांनी ज्या जबाबदाऱ्या घेतल्यात, मला खात्री आहे की ते अजितदादाच्या कामाची पद्धत अवलंबून पक्ष अधिक त्याच्या मार्गदर्शनाखाली मजबूत करतील, असेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Cabinet Reshuffle 2026
sunetra pawar delhi visit : ‘डबल रोल’वर सुनेत्रा पवार? उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं; खासदारकीबाबत तटकरेंनी दिली मोठी अपडेट

सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री होतील का? यावर, आम्हाला खात्री आहे की, सुनेत्रावाहिनी सर्वाधिक मतांनी निवडून येतील. सुनेत्रावाहिनी या निवडणुकीला सामोरे गेल्या, पवारसाहेबांनी ही त्याच्या पक्षाचा उमेदवार दिला नाही, काँग्रेसने ही नंतर उमेदवार मागे घेतला. अनेकांनी पाठिंबा दिला. त्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असे आदिती तटकरे यांनी विश्वास व्यक्त केला.

एक कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याला, सर्वोच्च पदावर काम करताना पाहण्याची इच्छा असते. मनातील तळमळ असते. ते मी तिथं मांडली आहे. कुठं ना कुठ, तरी वाटतं की, अजितदादाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, म्हणजे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न, सुनेत्रावहिनींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं. मी कार्यकर्ता म्हणून भावना मांडल्या याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही आदिती तटकरे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com