

Marathi mandatory auto drivers Maharashtra : रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य करण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठी सक्तीचा निर्णय घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संविधानाच्या विरोधात वागत आहेत. देशाच्या संविधानानुसार कोणीही भाषेवरून त्रास देऊ शकत नाही, अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
या वेळी सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसैनिक व सदावर्ते यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठी येत नसलेल्या वाहनचालकांचे परवाने एक मेपासून रद्द करण्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी घोषणा केली. यावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. ॲड. सदावर्ते यांनी भाईंदर पूर्व भागातील रिक्षाचालकांची भेट घेण्यासाठी आले होते.
निवडणुकीच्या वेळी सरनाईक यांना हिंदी भाषा बोलीभाषा वाटत होती. मात्र, निवडणूक संपल्यावर ते रिक्षाचालकांना मराठी (Marathi) भाषेची सक्ती करत आहेत. रिक्षाचालकांना चले जाव, असे सांगितले, तर तुम्हालाही मंत्रिपदावरून चले जाव, असे सांगावे लागेल, अशी टीका गुणरत्ने यांनी केली.
सदावर्ते यांना जे बोलायचे असेल ते बोलू दे, आम्ही आमचे काम करत रहाणार. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला साहित्यिकांनीही पाठिंबा दिला आहे. कोमसाप व मुंबई मराठी साहित्य संघ संयुक्तपणे रिक्षाचालकांना मराठी शिकवणार आहेत, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
राज ठाकरे यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, 'राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी एकाही रिक्षाचालकावर हात उचलला, तर त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल.'
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने, मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी भेट घेतलेल्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मराठी बोलता आले पाहिजे हा कायदाच आहे. त्यामुळे या निर्णयाला मनसेचा पाठिंबा आहे. मराठीचा सन्मान करायला शिका आणि राज ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणे बंद करा, अन्यथा गाठ मनसेची आहे, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.