Vaibhav Naik, Rajan Salvi News Sarkarnama
कोकण

Konkan News : शिंदे–फडणवीस सरकारच्या कारवाईचा धसका ? ठाकरेंच्या दोन्ही आमदारांचे महामार्गाच्या प्रश्नावर मौन

Raj Thackeray News : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला घेरले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai-Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला घेरले आहे. त्या धर्तीवर राज्यातील विरोधी पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवणचे आक्रमक आमदार वैभव नाईक व राजापुर विधानसभेचे आमदार राजन साळवी या दोन्ही नेत्यांनी खड्डेमय महामार्गाच्या प्रश्नावर मौन बाळगले आहे. या दोन्ही आमदारांनी शिंदे–फडणवीस सरकारच्या कारवाईचा धसका घेतला असल्याची चर्चा आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच आता गणेशोत्सवासाठी मुंबईतील (Mumbai) नागरिक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे परतता. त्यामुळे मनसेच्या वतीने महामार्गासाठी पुन्हा आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. तसा आदेशच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना दिला आहे. महामार्गासाठी मनसे आक्रमक झाली असताना ठाकरेंचे आमदार मात्र, शांत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. त्या विरोधात सुरुवातीच्या काळात सातत्याने आक्रमक भुमिका आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि राजन साळवी (Rajan Salvi) यांनी मांडली. त्यानंतर शिंदे–फडणवीस सरकारच्या विरोधात राहिलेल्या आमदारांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला. त्यात वैभव नाईक आणि राजन साळवी यांनाही नोटीसा देत 'एसीबी'ने चौकशी केली. दोन्ही आमदारांच्या घरांची मोजदाद करण्यात आलेली.

त्यामुळे सध्याचा काळात कोकणातील हे दोन आमदार सरकार विरोधी मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत. या दोन्ही आमदारांनी चौकशी सूरू असली तरीही आम्ही दबावाला भीक घालणार नाही, अशी भूमिका सातत्याने घेतली आहे. तरी महामार्गा सारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांच्या चुप्पी मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT