Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही; शरद पवार मतदारसंघ सोडणार का..

Udhav Thackeray लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
Udhav Thackeray, Sharad Pawar
Udhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai Shivsena News : सातारा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेने उमेदवार द्यावा व निवडणूक लढवावी. यापूर्वीच्या निवडणुकांत पक्षाच्या उमेदवारांना अडीच लाखांवर मते मिळाली आहेत. त्यामुळे यावेळेसही ही जागा लढवावी, अशी आग्रही मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या सातारमधील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे केली. मात्र, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून शरद पवार हा मतदारसंघ सोडणार का हा ही प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचा Satara Loksabha आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत, सुरज चव्हाण, दिवाकर रावते, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तसेच जिल्हा, तालुका प्रमुख उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीला इंडिया आघाडी म्हणून आपण सामोरे जाणार आहोत. शरद पवार सुध्दा आपल्या सोबत आहेत, असे या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे लवकरच आघाडीतील घटक पक्षांची एकत्रित बैठका विविध मतदारसंघात घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

भाजप-सेना युती असताना हा मतदारसंघ सेनेकडे होता. या मतदारसंघातून सेनेच्या चिन्हावर पुरुषोत्तम जाधव लढले होते. त्यानंतर भाजपत असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सेनेत घेऊन 2019 ला ही निवडणूक लढली होती. या दोघांनीही चांगली मते घेतली होती. तर दुसरीकडे खासदार शरद पवार हा मतदारसंघ ठाकरे गट शिवसेनेला सोडणार का याचीच उत्सुकता आहे.

Udhav Thackeray, Sharad Pawar
Karad BJP News : चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका; म्हणाल्या, महिलांच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून राजकारणच...

त्यामुळे आता पुन्हा या मतदारसंघाची मागणी होण सहाजिक आहे. मात्र, ठाकरे गटाकडे साताऱ्यात एकही मातब्बर नेता नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या इच्छेला उद्धव ठाकरे कसा न्याय देणार याची उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com