Raigad Irshalwadi Landslide Sarkarnama
कोकण

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीतील बेपत्ता लोकांचा शोध थांबणार?

Raigad Irshalwadi Landslide : घटनेला 100 तास होऊनही बेपत्ता लोक सापडत नसल्याने बचावकार्य थांबविण्याच्या हालचाली

सरकारनामा ब्यूरो

Raigad News: इर्शाळवाडीतील दुर्घटनेतील बेपत्ता लोकांना (ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या) मृत घोषित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या घटनेला 100 तास होऊनही बेपत्ता लोक सापडत नसल्याने बचावकार्य सोमवारपासून थांबविण्याच्या दृष्ट्रीने निर्णय होऊ शकतो.

या संदर्भात सरकार, प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या घटनेतील मृतांचा आकडा 80 इतका होऊ शकतो. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

इर्शाळवाडीत चार दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 27 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेला 100 तास उलटून गेले. तरीही बेपत्ता असलेल्या 57 लोकांचा शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणांनी मोठे प्रयत्न केले. त्यासाठी बचावकार्यात वेगवेगळ्या यंत्रणेची मदतही घेण्यात आली.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. पंरतू, बेपत्ता लोक सापडण्याची शक्यता नसल्याने शेवटी आता बचावकार्याची मोहीम थांबविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे बेपत्ता लोकांना मृत घोषित केले जाऊ शकते.

त्यासाठी गावकऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. गावकऱ्यांची भूमिका सरकारला कळवू, त्यावर अंतिम निर्णय घेण्याची विनंतीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे बालदी यांनी सांगितले.

याबाबातच्या कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय होईल. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि धुक्यांमुळे घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या बचावकार्यात अडथळे येत होते. तर या घटनेतून बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT