रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात फोंडळवाडी गावातील ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश नसून ‘घरवापसी’ असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात महत्वाची राजकीय उलथापालथ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शहरातील फोंडळवाडी गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. पण हा प्रवेश नसून ती ‘घरवापसी’ असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तर मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेससह खासदार सुनील तटकरे यांना धक्का दिल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. हा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम माणगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला.
सध्या रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद विकोपाला गेला आहे. मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे आमदार शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादीसाठी जिवाचे रान करून काम करताना दिसत आहे. अशातच नुकताच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून आता फक्त निकाल येणे बाकी आहे.
यादरम्यान आता पुन्हा एकदा जिल्ह्यात पक्ष वाढीची स्पर्धा सुरू झाली असून गोगावले यांनी राष्ट्रवादीसह तटकरेंना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी अख्ख गाव फोंडळवाडीच शिवसेनेत आणत शिवसेनेची ताकद तळा तालुक्यात वाढवली आहे. फोंडळवाडी गाव हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेशी जोडले गेले होते. स्वर्गीय दत्ता चोरगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अख्ख गाव सक्रियपणे कार्यरत होते.
मात्र चोरगे यांच्या आजारपण आणि निधनानंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीकडून गावाकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील काही वर्षांत गावात अपेक्षित विकासकामे झाली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावाकडे वाढत चाललेले दुर्लक्ष पाहता ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत गेली. आणि रस्ते, पाणी, विकासकामे व गावाच्या सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान न मिळाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान आमदार भरत गोगावले यांची कार्यपद्धती, तळा शहरप्रमुख राकेश वडके यांचे समाजकारण, तसेच तालुकाध्यक्ष प्रद्युम्न ठसाळ, लिलाधर खातू आणि नमित पांढरकाने यांच्यावर विश्वास ठेवून फोंडळवाडी ग्रामस्थांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे फोंडळवाडीचे अध्यक्ष शाम पवार यांनी सांगितले आहे. तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी फोंडळवाडी अध्यक्ष शाम पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू, नमीत पांढरकामे शिवसेनेचे सर्व नगरसेवक यांसह फोंडळवाडी ग्रामस्थ महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे तळा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
1. फोंडळवाडी गावातील ग्रामस्थांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
➡️ ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
2. हा प्रवेश ‘घरवापसी’ का मानला जात आहे?
➡️ अनेक ग्रामस्थ पूर्वी शिवसेनेशी संबंधित असल्याने हा प्रवेश घरवापसी म्हणून ओळखला जात आहे.
3. या घटनेमुळे कोणत्या पक्षाला धक्का बसला आहे?
➡️ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
4. या कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले होते?
➡️ माणगाव येथील शासकीय विश्रामगृहात हा भव्य कार्यक्रम पार पडला.
5. या पक्षप्रवेशामागे कोणाची प्रमुख भूमिका होती?
➡️ मंत्री भरत गोगावले यांची या राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.