Vinayak Raut
Vinayak Raut Sarkarnama
कोकण

Vinayak Raut : वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात; विनायक राऊतांचे आरोप

सरकारनामा ब्युरो

Nanar Refinery : राजापूर येथील एका वर्तमानपत्राचे शशिकांत वारीसे (Shashikant Warise) पत्रकार होते. ते रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटास समर्थन करीत होते. तर आपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करीत होते. या रिफायनरीला सर्वात जास्त जमिनी मिळवून देण्याचा विक्रमच आंबेरकर यांच्या नावावर आहे.

आंबेरकर यांनी यापूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून अनेकांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच आंबेरकरांवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही राऊत यांनी केली.

विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, "यापूर्वी एका सरपंचाच्या मुलावर गाडी चालवून अपघात घडविला होता. त्यात त्या मुलाचे दोन्ही पाय निकामी झाले होते. राजपूर न्यायालयातही रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात दगडही घातले होते. तसेच या कोर्टातही तुम्हाला ठार मारू, अशी धमकी पंढरीनाथ आंबेरकरने दिली होती. त्याच्याविरोधात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे."

यानंतर राऊत म्हणाले, "आंबेरकरांच्या या कारवायांच्या पार्श्वभूमीवर वारीसेंच्या झालेल्या मृत्यूची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी. पत्रकाराचा अपघात नसून रिफायनरीच्या दालालाने घडवून आणलेला घातपात आहे. नागरिकांनी केलेल्या चौकशीच्या मागणीला माझा खंबीर पाठिंबा आहे. तसेच रत्नगिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही या प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहे."

गेल्या एक वर्षात आंबेरकरांनी घातपात घडवून आणण्याचा दोन ते तीन घटना आहेत. तसेच न्यायालयात नागरिकांच्या अंगावर दगडफेक केली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर कालची घटना घडली आहे. याचा लेखाजोखाच पोलिसांसह न्यायालयात मांडणार आहे.

आता तर आंबेरकराने हद्द केली. वारीसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बॅनरवर कुख्यात गुडांचे फोटो, अशी बातमी व्हायरल केल्यानेच त्यांचा घातपात केला आहे, असं म्हणणं स्थानिक ग्रामस्थांचं असल्याचंही राऊत यांनी सांगितले.

पुढे राऊत म्हणाले की देशातील काही भागात मोठे प्रकल्प राबविताना स्थानिक गुंडाच्या माध्यमातून धमकावून जीवे मारण्याचे प्रयत्न केले जातात, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र देणार आहे. तसेच संसदेतही हा मुद्दा मांडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT