Vijaykumar Deshmukh News : काडादींचा डाव उधळण्यासाठी देशमुखांची जोरदार फिल्डिंग : मोठे मासे लावले गळाला?

कारखान्याच्या चिमणीच्या निमित्ताने जागी झालेल्या ‘लिंगायत अस्मिते’चा फटका बसू नये, यासाठी देशमुखांनी ‘लिंगायत तितुका मेळवावा’ पद्धतीने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Vijaykumar Deshmukh And Other Leader
Vijaykumar Deshmukh And Other LeaderSarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Siddheshwar Sugar Factory) सर्वेसर्वा धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांच्यातील विळ्याभोपळ्याचे संबंध आता संपूर्ण महाराष्ट्राला तोंडपाठ झाले आहेत. मध्यंतरी काडादी यांनी ‘आपण मैदानातच आहोत’ असे आव्हान देशमुखांना दिले होते. तसेच, कारखान्याच्या चिमणीच्या निमित्ताने जागी झालेल्या ‘लिंगायत अस्मिते’चा फटका बसू नये, यासाठी देशमुखांनी ‘लिंगायत तितुका मेळवावा’ पद्धतीने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गळाला मोठे मासेही लागले आहेत. (Strong fielding by Vijaykumar Deshmukh to fend off Dharmraj Kadadi's challenge)

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या देशमुख आणि काडादी यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही. दोघांकडून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देऊन झालेले आहे. मात्र, कारखान्याच्या चिमणीच्या निमित्ताने राजकीयदृष्ट्या चाणाक्ष असलेल्या काडादींनी पद्धतीशीरपणे त्याला लिंगायत अस्मितेचा मुद्दा बनविला. सोलापूरच्या राजकारणात तसे वातावरणही मध्यंतरी निर्माण झाले होते. या लिंगायत अस्मितेमध्ये आपल्या राजकीय करिअरची इतिवृत्ती होऊ नये, याची काळजी सोलापूर शहर उत्तरमधून विजयाचा चौकार लगावणारे देशमुख यांनी घेतल्याचे दिसून येते.

Vijaykumar Deshmukh And Other Leader
Solapur News : सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीला सोडला, तर तुम्ही आम्हाला बारामती सोडणार का? काँग्रेसचा रोहित पवारांवर पलटवार

काडादी यांनी पेटवलेल्या ‘लिंगायत अस्मिते’ला देशमुखांनी त्याच पद्धतीने उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शहर उत्तरच्या राजकारणात प्रभाव राखून असणाऱ्या लिंगायत समाजातील नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्यास देशमुखांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नेहमीच्या ‘शैली’चा खुबीने वापर करून घेतला आहे. काँग्रेसने शहराध्यक्षपदाची वस्त्रे ज्यांच्याकडून काढून घेतली, त्या प्रकाश वाले यांच्याशी देशमुख यांनी जवळीक वाढली आहे. वास्तविक यापूर्वीही हे दोघे अनेकदा एकत्र आले आहेत. मात्र, शहर उत्तरमध्ये मोठा कनेक्ट असलेले अशोक उपाध्ये यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले देशमुख आणि वाले यांचे एकत्रित छायाचित्र पद्धतीरपणे सोशल मीडियावरून व्हायरल होईल, अशी किमया साधत दोघांनीही आपला हेतू साध्य केला आहे.

Vijaykumar Deshmukh And Other Leader
Rajan Patil News : राजन पाटलांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला? : पक्षांतराबाबत माजी आमदारांचाही गौप्यस्फोट

सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक तथा महेश बॅंकेचे उपाध्यक्ष आणि एकेकाळचे काडादींचे कट्टर समर्थक मल्लिनाथ ऊर्फ तम्मा मसरे यांनाही देशमुख यांनी आपल्या गोट्यात पद्धतशीरपणे ओढले आहे. काडादींचे विरोधक राजशेखर हिरेब्बू, बाळासाहेब मुस्तरे (यांच्या भावाला सिद्धेश्वर पंच कमिटीच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात आले आहे), तसेच, काडादींचे कट्टर विरोधक असलेले थोबडेंची तिसरी पिढी सिद्धेश आणि प्रतीकही राजस्थानमधील या लग्न समारंभाला आवर्जून हजर होती. विशेष म्हणजे या सर्वांना तिकिटे आणि तेही एकाच बोगीत मिळावीत, यासाठी देशमुखांनी आपले वजन खर्ची केल्याची चर्चा आहे.

Vijaykumar Deshmukh And Other Leader
थोरातांच्या राजीनाम्यावर शिंदे म्हणतात ‘काळजी करण्याचे कारण नाही...’

एकूणच काडादी यांच्या अस्त्राला परतवून लावण्यासाठी देशमुखांनी सर्व प्रकारचे प्रयत्न चालवले आहेत. विधानसभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षांचा कालावधी असतानाही विजयकुमार देशमुखांनी आतापासूनच बेरजेच्या राजकारणाला सुरूवात केली आहे. आता धर्मराज काडादी यांचा नवा डाव कसा असणार आहे, याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com