Narayan Rane  Sarkarnama
कोकण

Sindhudurg Politics : नारायण राणे यांच्या ट्विटने कोकणात धमाका; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत स्पष्टच बोलले

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency News :

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीवरून संपूर्ण कोकणात चर्चा आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री Narayan Rane यांनी काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चेत आणखी रंगत आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या महायुतीतील मित्रपक्षला म्हणजेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना नारायण राणे यांनी सूचक इशारा दिला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असं ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांनी केलेले हे ट्विट चर्चेत आले आहे. त्यामुळे एकंदरच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा मोठा चर्चेचा ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, राणे यांनी केलेल्या ट्विटचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ज्याची उमेदवारी फायनल होईल. त्याला भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी देणार का? अशीही चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे आता लवकरच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या नवीन घडामोडी पाहायला मिळतात? याचीही उत्सुकता आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांनी ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओ चार दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून भाजपचा उमेदवार उभा रहाणार, असे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, भाजपकडून कोणीही उमेदवार उभा राहिला तरी विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

पण शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत उभे राहिले तर विनायक राऊत यांना खूप मेहनत करावी लागणार आहे, अशा प्रतिक्रिया शिवसेनेकडून येत आहेत.

दरम्यान, आता खरी लढत भाजप व शिवसेना याचीच होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत हे फायनल झाले असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांनीही तशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. अशातच आता नारायण राणेंनी ट्विट केले आहे. त्यामुळे कोण उभे राहते? यावरून उद्धव ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत यांच्या निकालाचे गणित अवलंबून असणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण कोकणचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT