Ratnagiri Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच; कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांचे स्टेटस ठेवल्याने चर्चांना उधाण

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency Politics Kiran Samant News : महायुतीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे मित्रपक्षांमध्ये रस्सीखेसच सुरू आहे. रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघातही हे चित्र आहे...
Kiran Samant
Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency News :

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट ) कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच, भावी खासदार किरण सामंत अशा स्वरूपाचे स्टेटस ठेवण्यात आले आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत यांना फायनल झाली का? अशा चर्चा रंगल्या आहेत. सामंत यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर किरण सामंत यांना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी फायनल झाल्याच्या स्वरुपाच्या पोस्ट आहेत.

शिवसेना भाजपकडून ( Lok Sabha Election 2004 ) उमेदवारीचे दावे सुरुच आहेत. सोशल मीडियावर शिंदे आणि भाजप गटात रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम आहे.

Kiran Samant
Uday Samant : रत्नागिरीतील स्टरलाईटच्या जागेपैकी 200 एकर जागा संरक्षण दलाकडे; 15 दिवसांत होणार करार

भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड व मावळ या तीनही लोकसभा जागांवर भाजपचे कमळ फुलेल, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळवर अन्याय नको. देवेंद्रजींनी सांगितले आहे की, या वेळेला कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. दुसरीकडे शिंदे गटाकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावर दावा सांगणारे कार्यकत्यांचे स्टेटस ठेवण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच चार दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतानाचा किरण सामंत यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्या कार्यकत्यांकडूनही किरण सामंत भावी खासदार, असे स्टेटस ठेवल्याने चर्चेचा विषय बनला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने निवडणूक निरिक्षक न  दिल्याने हा मतदारसंघ कुणाला सुटणार याची चर्चा सध्या अवघ्या लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.

सध्या कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

Kiran Samant
Narayan Rane News : राजन साळवी यांनी नारायण राणेंना डिवचलं; तर आमचा विजय निश्चित...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com