Narayan Rane Sarkarnama
कोकण

Narayan Rane : नारायण राणेंनी भरला ठाकरेंच्या शिलेदाराला सज्जड दम; म्हणाले, '...तर तुझ्या घराला टाळेच ठोकतो'

Narayan Rane warning News : चिपी विमानतळाला टाळे मारूनच दाखव असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला दिला सज्जड दम दिला आहे. विमानतळाला टाळे ठोकले तर तुझ्या घराला टाळे ठोकेन, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

Sachin Waghmare

Sindhudurg News : चिपी विमानतळावरून नारायण राणे आणि स्थानिक उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेतेमंडळीत चांगलाच वाद रंगला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सॊडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. चिपी विमानतळाला टाळे मारूनच दाखव असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला दिला सज्जड दम दिला आहे. विमानतळाला टाळे ठोकले तर तुझ्या घराला टाळे ठोकेन, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

रत्नागिरीतील चिपी विमानतळावरून ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार वैभव नाईक आणि भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात जुपंल्याचे पाहायला मिळत आहे. कणकवली पर्यटन महोत्सवात बोलताना नारायण राणेंनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली. चिपी विमानतळाला विरोध करणारे हे शिवसेनेची मंडळी आहेत, अशा शब्दात राणेंनी टीका केली.

चिपी-मुंबई विमानसेवा येत्या 15 दिवसांत सुरू करा, नाहीतर विमानतळाला टाळे ठोकणार, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला होता. वैभव नाईक यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नारायण राणे यांच्याकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. ‘विमानतळाला टाळे ठोकून दाखव तुझ्या घराला टाळे ठोकू’, असा प्रतिइशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

चिपी विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकेन, असा सज्जड दम खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना दिला आहे. चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक येत्या पंधरा दिवसात सुरू न झाल्यास चिपी विमानतळाला टाळे ठोकणार, अशा पद्धतीचा इशारा वैभव नाईक यांना प्रशासनाला दिला होता. वैभव नाईक यांच्या या इशाराचा नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर एकेरी टीका केली आहे.

धमकी देण्यापेक्षा विमानतळ सुरू करा : वैभव नाईक

दुसरीकडे वैभव नाईक यांनी या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वैभव नाईक यांना आव्हान दिले होते. विमानतळाला टाळे ठोकले तर तुझ्या घराला टाळे ठोकेन, असा इशारा राणे यांनी दिला होता. यावर आता वैभव नाईक यांनीही नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, असा पलटवार नाईकांनी केला आहे. मला धमकी देण्यापेक्षा विमानतळ सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT