Santosh Deshmukh Murder Case : विष्णू चाटेला दिलासा नाहीच; वाल्मिक कराडचे काय होणार?

Vishnu Chate Remanded to 14 Day Judicial Custody : विष्णू चाटे हा संतोष देशमुख प्रकरणात मुख्य आरोपी आहे.या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.
Walmik Karad, Vishnu chate
Walmik Karad, Vishnu chate Sarkaranama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयाने दिलास देण्यास नकार दिला आहे. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्याला जामीन मिळणार का? याबाबत चर्चा होती. मात्र, न्यायालयाने चाटेला दणका देत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती. मात्र, या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Walmik Karad, Vishnu chate
Congress Party Challenges : काँग्रेसला घरातलं सोसेना, सरकारला घेरण्यासाठी मुद्यांची शोधाशोध

विष्णू चाटे हा संतोष देशमुख प्रकरणात मुख्य आरोपी आहे.या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आज चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळणार की पोलिस कोठडी याकडे लक्ष होते. मात्र, मात्र त्याला न्यालायता हजर केले असता काही मिनिटांमध्येच त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सरकारी वकील अनुपस्थित?

विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी या प्रकरणातील सरकारी वकील अनुपस्थित असल्याच्या माहिती समोर येत आहे. या विषयी एका मराठी वर्तमान पत्राच्या संकेतस्थळने वृत्त दिले आहे.

वाल्मिक कराडचे काय होणार?

मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यात कोठडीत आहे. त्यांच्या कोठडीची मुदत उद्या (मंगळवारी) संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा कोठडीत होणार की त्यांना जामीन मंजुर होणार याची उत्सुकता असणार आहे.

Walmik Karad, Vishnu chate
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी 10 वर्षात काय कमावले काय गमावले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com