Nitesh Rane News Sarkarnama
कोकण

Konkan Politics : कोकणात 'मविआ'ला दूसरा धक्का; नितेश राणेंनी केला करेक्ट कार्यक्रम

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांचा भाजपला पाठिंबा

सरकारनामा ब्यूरो

Mla Nitesh Rane News : कोकणाच्या राजकारणात महाविकास आघाडीला भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे गट व राष्ट्रवादीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीत सत्तांतर झाले. आज सकाळी लांजा येथे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या पुर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव 13- 0 ने जिंकला. त्यामुळे आज शिंदे गटासह भाजपने मविआला दोन धक्के दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत (mitali sawant) यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये भाजपचे 8 आणि मिताली सावंत असे एकूण 9 तर शिवसेनेचे 7 असे संख्याबळ आहे.

शिवसेना (shivsena) ठाकरे गटाचे रोहन खेडेकर हे नगरसेवक अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात अपात्र ठरल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपचे 8 आणि सत्ताधारी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या गटाचे 8 असे बलाबल झाले होते.

मात्र, राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांनी सेनेच्या गटाची साथ सोडत भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. यासर्व नाट्यमय घडामोडीत कणकवली-देवगड मतदार संघाचे भाजप आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT