Nashik BJP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीसह छगन भुजबळांना मोठा धक्का; 'हा' नेता कमळ हाती घेणार...

NCP vs BJP : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगावच्या दौऱ्यावर असताना घेतली होती भेट...
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यात अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी येत्या १५ दिवसांत राज्यात दोन मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान केलं आहे. आता याचदरम्यान, नाशिकमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाजपकडून छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निकटवर्तीय व ग्रामीण भागामध्ये दांडगा जनसंपर्क असलेले सुनील मोरे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोरे यांचा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे होणार आहे. मोरे हे शहर विकास आघाडीच्या माजी ११ नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश करणार आहेत.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

सुनील मोरे (Sunil More) हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच भुजबळ यांच्यासाठी देखील मोरे यांचा भाजपप्रवेश हा मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपला नाशिकच्या ग्रामीण भागांत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मोरे हे नाशिकच्या सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. ते सटाण्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. याशिवाय भुजबळ यांच्या समता परिषदेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. 

बावनकुळेंच्या भेटीनंतर सूत्रं फिरली...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगावच्या दौऱ्यावर असताना सुनील मोरे यांची भेट घेतली होती.याचवेळी मोरे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर मोरे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येत आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray News : तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा? म्हणून फडणवीस गेले त्यांच्या मागे मागे !

...म्हणून मोरेंचा प्रवेश ठरणार भाजपसाठी फायद्याचा!

आगामी काळात होणाऱ्या राज्यातील पुणे, मुंबई, नाशिकसह इतर प्रमुख शहरांच्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या सुनील मोरे यांनी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वच मातब्बरांना पराभवाचा धक्का विजय खेचून आणला होता. त्यामुळे भाजपमधील त्यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com