Maharashtra Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या असून, नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, महायुतीमध्येच सुप्त संघर्षाला धार येताना दिसत आहे. दरम्यान, कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीत संघर्षामुळे वाद होताना दिसत असतानाच, आता कल्याण-डोंबिवलीत देखील राष्ट्रवादी-भाजप असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर एका कार्यक्रमात या नेत्याने भाजपचं कौतुक केल्यानेच या चर्चांना उधाण आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीमध्ये एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या संघर्ष टोकाला गेला आहे. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात सतत खटके उडताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक सलीम सारंग हे भाजपच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. तर ते लवकरच राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा आहेत. आता या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे आणि भाजपचं कौतुक केल्यामुळे या चर्चांना कारण ठरताना दिसत आहे. दरम्यान, अद्याप ते प्रवेश करणार की नाही, याबाबत कोणतीच पुष्टि झालेली नाही. पण याबाबत साम टीव्हीवर वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ज्यात सारंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर भाष्य केलं आहे. तर भाजपचं कौतुक करताना, भाजपच्या बाजूने विधाने केली आहेत. याचमुळे राष्ट्रवादीतील मुस्लिम चेहरा लवकरच भाजपवासी होईल, असा तर्क लावला जात आहे.
सारंग यांनी नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये दिवंगत अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी मुस्लिम समाजाला १० टक्के तिकीट देण्याचा निर्णय घेतला. भाजपबरोबर राहून अजितदादांनी मुस्लिम समाजासाठी कोणाला जमलं नाही, तेवढं काम केल्याचं सांगितलं.
याचवेळी सारंग यांनी, भाजप आणि मुस्लिम समाजावर बोलताना, भाजपमधील काही नेत्यांकडून मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली जातात. गेल्या ६५ वर्षांत देशात सत्ता कोणाची होती? असा सवाल करत भाजपला सत्तेत येऊन फक्त १५ वर्षे झाली आहेत. आमच्या पूर्वजांनी या मातीत रक्त सांडलं असून, देश स्वतंत्र झाल्यानंतर कुठे जायचं, याबाबत आमच्याकडे पर्याय होता.
मात्र, आम्ही भारतात राहणंच पसंत केलं. यानंतर आता एसआयआर सर्व्हे सुरू झाला आहे. पण यातून कागदपत्रांच्या मुद्द्यांवरून एकाही मुस्लिम नागरिकाला देशाच्या बाहेर काढण्यात आलेलं नाही. तेही भाजप सत्तेत असताना. उलट, सर्वांची कायदेशीर कागदपत्रे तयार करून देण्यात आली आहेत. तर भाजप मुसलमानांच्या सपोर्टची पार्टी बनलीय, असा दावा सारंग यांनी केला आहे. भाजपच मुस्लिमांच्या विकासकामं करत असल्याचेदेखील सारंग यांनी म्हटलं आहे.
त्यांनी अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती तरी भरता येणार नाही, हे जरी खरं असलं तरी, आमच्याकडे अनुभवी नेतृत्वांची कमी नाही. या सर्व नेत्यांनी फक्त एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सारंग यांनी ज्या पद्धतीने आपल्या पक्षाबद्दल बोलत असताना भाजपच्या बाजूने भाष्य केलं आहे. यामुळेच आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे. तर ते प्रवेश करणार का, याकडेदेखील राजकीय वर्तुळात लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.