Maharashtra Politics : मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव; विद्यार्थी आक्रमक, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितले, 'मुख्यमंत्र्यांनी दखल...'

Ashok Uike Girish Mahajan : डॉ. अशोक उईके यांचा राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या रुग्णालयात भेट घेतली.
Students protest demanding the resignation of Minister Dr Ashok Uike; Girish Mahajan rejects resignation possibility.
Students protest demanding the resignation of Minister Dr Ashok Uike; Girish Mahajan rejects resignation possibility.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. मात्र आंदोलन कायम आहे.

विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आदिवासी विकास मंत्र्यांनी जाणीवपूर्वक चिघळवल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची या विद्यार्थ्यांनी भेट घेत त्यांना पाठींबा दिला.शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीनेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांकडून उईके यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदिवासी मंत्र्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

त्यांनी शनिवारी आश्रम शाळेतील रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मंत्री महाजन यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

Students protest demanding the resignation of Minister Dr Ashok Uike; Girish Mahajan rejects resignation possibility.
Tribal Students Protest : काँग्रेसने अचूक टायमिंग साधलं; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे फडणवीस सरकारची कोंडी

'त्या' कुटंबांना मदत जाहीर

आश्रम शाळेतील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू नये. मागण्या मान्य होत असल्याने आदिवासी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली.

Students protest demanding the resignation of Minister Dr Ashok Uike; Girish Mahajan rejects resignation possibility.
Tribal Gen Z: कॉक्रोच पार्टी भाजपला अस्वस्थ करणार; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिला थेट `हा` अल्टिमेटम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com