NCP mayor of Pali joins BJP
NCP mayor of Pali joins BJP Sarkarnama
कोकण

राष्ट्रवादीला रायगडमध्ये मोठा धक्का : पालीच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना भाजपने (BJP) मोठा धक्का दिला आहे. तटकरे यांच्या मतदारसंघातील पाली सुधागड तालुक्यातील पालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा (Geeta Palrecha) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालरेचा यांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे. (NCP mayor of Pali joins BJP)

रायगड जिल्ह्याच्या पाली-सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या गीता पालरेचा ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश राष्ट्रवादीला मोठी हानी पोहोचवू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊन सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. गीता पालरेचा यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कारण, त्यांनी भाजपत प्रवेश करताना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या सर्व पदाचा त्याग केला आहे. त्या भाजपच्या विचारधारेवर भाजप पक्ष एक नंबरचा कसा होईल, यासाठी प्रयत्न करतील, असे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे गीता पालरेचा यांच्या कुटुंबाशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. त्या भाजप प्रवेशामुळे आम्हाला रायगडमध्ये मोठी ताकद मिळेल, असा आशावादही चव्हाण यांनी या वेळी बोलून दाखविला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT