राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत.
पुण्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे तर मुंबईची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
प्रस्थापित नेते मैदानात उतरवून पक्षाने आक्रमक निवडणूक रणनिती स्पष्ट केली आहे.
Mumabi News : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज ही घोषणा केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पुणे तर युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये पक्षाने प्रस्थापित नेत्यांना आणि खासदारांना मैदानात उतरवून आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
पक्षाने ज्येष्ठ नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर या शहरांची धुरा सोपवली आहे. नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेचे नेतृत्व स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे करणार आहेत. तर पिंपरी चिंचवडसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांची संयुक्त नियुक्ती केली आहे.
कोल्हापूरसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सोलापूरसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर विश्वास दर्शवण्यात आला आहे. सांगलीची जबाबदारी आमदार जयंत पाटील सांभाळणार असून, उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगरसाठी खासदार नीलेश लंके, तर नाशिक आणि वसई-विरारसाठी सुनील भुसारा यांची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी खासदार बजरंग सोनवणे, परभणीसाठी खासदार फौजिया खान निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील. नागपूरची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिली आहे. या सर्व नियुक्त्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक प्रभारी असे :
मुंबई : रोहित पवार
ठाणे, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर : जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई , पनवेल : शशिकांत शिंदे
कल्याण डोंबिवली, भिवंडी : बाळ्यामामा म्हात्रे
वसई विरार, नाशिक : सुनील भुसारा
निवडणूक प्रभारी असे :
पुणे : सुप्रिया सुळे
मालेगाव : भास्कर भगरे
अहिल्यानगर : नीलेश लंके
जळगाव : संतोष चौधरी
धुळे : प्राजक्त तनपुरे
निवडणूक प्रभारी असे :
पिंपरी चिंचवड : डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार
सोलापूर : धैर्यशील पाटील
कोल्हापूर : हर्षवर्धन पाटील
इचलकरंजी : बाळासाहेब पाटील
सांगली-मिरज-कुपवाड : जयंत पाटील
निवडणूक प्रभारी असे :
छत्रपती संभाजीनगर : बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा : जयप्रकाश दांडेगावकर
परभणी : फौजिया खान
जालना : राजेश टोपे
लातूर : विनायक जाधव पाटील
निवडणूक प्रभारी असे :
अमरावती : रमेश बंग
अकोला : डॉ. राजेंद्र शिंगणे
नागपूर : अनिल देशमुख
चंद्रपूर : अमर काळे
Q1. राष्ट्रवादी शरद पवार गटाने कोणती घोषणा केली आहे?
➡️ महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत.
Q2. पुणे महापालिकेची जबाबदारी कोणाकडे आहे?
➡️ खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे.
Q3. मुंबई महापालिकेची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे?
➡️ आमदार रोहित पवार यांच्याकडे.
Q4. ही घोषणा कोणी केली?
➡️ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी.
Q5. या नियुक्त्यांचा राजकीय अर्थ काय?
➡️ राष्ट्रवादी शरद पवार गट महापालिका निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने उतरल्याचे संकेत मिळतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.