Raigad News : रायगडमध्ये महायुतीतील दोन पक्षांमधील वाद आता विकोपाला गेला असून नेत्यांच्यावर टाका आता पक्षापर्यंत येऊन पोहचली आहे. पालमंत्रीपदावर सुरू झालेली टीका नक्कल करण्यापर्यंत आणि त्याचे प्रत्त्युतर देताना थेट वेटर अशा शब्दांचा उच्चार येथे झाल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर केलेल्या खालच्या तापळीवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'शिंदेंची शिवसेना म्हणजे फितुरी केलेला पक्ष' असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केली आहे. यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी तटकरेंवर केलेल्या खालच्या तापळीवर टीकेला सुधाकर घारे यांनी उत्तर दिलं आहे. घारे यांनी, शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला. शिंदेंचा पक्ष हा पळून जाऊन फितुर झालेला लोकांचा पक्ष असल्याचा गंभीर आरोप घारे यांनी यावेळी केला. पळून जाऊन सत्ता काबीज करणे म्हणजे फितुरीच आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय असाही टोला घारे यांनी लगावला आहे.
अजित पवार यांनी एका तासात भाजपला पाठिंबा देत सत्तेत सामील झाले. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखं आपल्या आमदारांना गोवा, गुवाहाटी असं पळून जाऊन नंतर सत्तेत येणारा आमचा पक्ष नाही अशा शब्दात घारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केलीय. थोरवे म्हणतात की भरतशेठ छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. पण छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी सत्तेसाठी कधी फितुरी केली केली नव्हती. यांची जर आपण फितुरी बघीतली तर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता, असाही दावा केला घारे यांनी केला आहे.
तसेच यावेळी घारे यांनी, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती पंढरी राऊत यांना मारहाणी थोरवे यांच्याच सांगण्यावरून झाली. याप्रकरणात तेच आरोपी होते. तर या प्रकरणात 307 चा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अद्यापही सुनावणी सुरू आहे. तर कर्जत मतदारसंघात गेल्या सहा वर्षातील परिस्थिती बीडपेक्षा वाईट असून भरबाजारपेठे थोरवेंच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीला मारहाण केली होती. यानंतर त्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता, असाही दावा घारे यांनी केलाय.
थोरवे यांनी तटकरे यांना राजीनामा देवून निवडून यावे असं केलेल्या आव्हानालाही घारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. घारे यांनी तटकरे देशाचे, महाराष्ट्राचे आणि जिल्ह्याचे चांगले नेतृत्व करत आहे. रायगड जिल्ह्यात जो खऱ्या अर्थाने विकास झाला असेल, तो त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिले नाव त्यांचेच घेतलं जातं.
लोकसभा निवडणुकीत तटकरेना महाडमधून 3 हजारांचे मताधिक्य मिळाले. पण भरतशेठ यांना विधानसभेला 25 हजारांच्या मताधिक्याने तटकरे निवडून आणले. पण याद राखा तटकरेंनी फक्त नॅपकीन उडवला तर तुमची जिल्ह्यात धावपळ उडाली. यामुळे तटकरेंच्या नादी लागू नका असा सल्ला वजा इशारा घारे यांनी थोरवेंसह शिवसेना नेत्यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.