
Raigad Mahad political news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या 'नॅपकिन स्टाईल'वर डिवचलं होतं. गोगावले यांच्या या स्टाईलवरून तटकरे अन् गोगावले यांच्यात मध्यंतरी चांगलीच जुंपली होती.
आता मंत्री गोगावले यांचे कार्यकर्ते खासदार तटकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. गोगावले यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात 'नॅपकिन'चं वाटप करत, खासदार तटकरेंना डिवचलं आहे. विशेष म्हणजे, मंत्री गोगावलेंच्या समर्थकांनी 'नॅपकिन' हवेत उडवले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार तटकरेंनी काही दिवसांपूर्वी मंत्री गोगवले यांच्या 'नॅपकिन' वापराची नक्कल महाडमध्ये केली होती. यावरून तटकरे अन् गोगावले यांच्यात चांगलीच जुंपली. शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा अभिष्टचिंतन कार्यक्रम झाला. यात त्यांच्या समर्थकांनी 'नॅपकिन'चं वाटप केलं. गोगावले समर्थकांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना डिवचलं आहे.
मंत्री गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी या सभेत सफेद 'नॅपकिन'चे वाटप केले. गोगावले नेहमी हातात सफेत 'नॅपकिन'चा वापर करतात, समर्थकांनी त्याच रंगाच्या 'नॅपकिन'चे वाटप करत, खासदार तटकरेंना डिवचलं आहे. गोगावले यांच्या समर्थकांच्या या कृतीवर शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यात महायुतीमध्ये असून देखील वाद आहे. आदिती तटकरेंना पालकमंत्रिपद जाहीर झाले होते. परंतु मंत्री गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. यानंतर पालकमंत्रिपदाचं घोंगडं भिजतंच आहे. यावरून तटकरे अन् गोगावले यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगतो आहे.
परंतु, शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी आज पुन्हा रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले. पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार आहे, अशी चर्चा आहे. पण मला याबाबत माहिती नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा तो आम्हाला मान्य असेल, असेही मंत्री गोगावले यांनी म्हटले. मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत प्रचंड आक्रमक आहेत. परंतु मंत्री गोगावले अलीकडच्या काळातील भूमिका पाहिल्यास ते काहीसे शांत झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.