Mahad  : Sarpanch&gram panchayat Membar
Mahad : Sarpanch&gram panchayat Membar Sarkarnama
कोकण

ग्रामपंचायतमधील मोठ्या यशानंतरही आमदार गोगावलेंनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

सरकारनामा ब्यूरो

महाड (जि. रायगड) : महाड (Mahad)) विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीत (Election) भरघोस यश मिळाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभात आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी कार्यकर्त्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. ते म्हणाले की, जनतेने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे निसटता पराभव पत्करावा लागला आहे, यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना झापले. (New Sarpanch and Gram Panchayat members felicitated in Mahad)

महाड विधानसभा मतदार संघातील बाळासाहेबांची शिवसेनेकडून विजयी झालेले ६४ सरपंच आणि ४५० सदस्यांचा करण्यात आला होता. या प्रसंगी विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये महिला सदस्य आणि सरपंच मोठ्या संख्येने निवडून आल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्याला बरेच काही शिकण्यास मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळाले असले तरी काही ग्रामपंचायतींमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या किरकोळ चुका कारणीभूत ठरल्या असल्याने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे आमदार गोगावले यांनी सांगितले. यशाची ही मालिका नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम ठेवायची आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

या समारंभाला पोलादपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक, पोलादपुर तालुका प्रमुख निलेश अहिरे, मुंबई संपर्क प्रमुख किशोर जाधव, माणगाव तालुका प्रमुख ॲड महेंद्र मानकर,आरपीआयचे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष केशव हाटे, महाड शहर महिला प्रमुख विद्या देसाई, पद्मा शिरपूरकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT