Sindhudurg Politics : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिवसेना(ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातला, सुरक्षा रक्षकास मारहणही केल्याचेही समोर आले आहे. एका कंत्राटाची कागदपत्र जमा करताना वाद झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांचीही उपस्थिती होती. या घटनेवरून आता माजी खासदार नीलेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांवर जोरदार टीका केली आहे.
माजी खासदार नीलेश राणे(Nilesh Rane) यांनी वैभव नाईकांवर टीका करताना म्हटले की, 'आज सिंधुदुर्ग जिल्हापरिषदमध्ये तो एका सावंतवाडीच्या टेंडरवरून घडला. आठ कोटींचं काहीतरी ते एक टेंडर होतं. त्या टेंडरसाठी वैभव नाईक त्यांचे सगळे सहकारी आणि उबाठा गटाची काही अन्य लोकही त्यातमध्ये होती. ते तिथे गेले आणि आतमध्ये राडा केला. तोडफोड केली, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
सावंतवाडीत जे काम होतं, त्यासाठी वैभव नाईकांना त्यांच्या मर्जीतील एक ठेकेदार आणि त्यांच्या मर्जीतील ठेकेरादाराला ते काम मिळावं, यासाठी ते तिथे पोहचले. जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला टेंडर मिळणार नाही किंवा मिळत नाही. त्यांनी तिकडे धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मारामारी सुरू केली आणि तोडफोड सुरू केली. जे बघून मग पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला.'
तसेच 'एक आमदार या नात्याने आपण आता स्वत:ला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, एका आमदाराला हे शोभतं का? म्हणून मी जेव्हा कधी त्यांच्याबाबत बोलतो तेव्हा माझं एवढंच म्हणणं असतं की, यांच्यात परिपक्वता कधी येणार? राजकीय परिपक्वता तर या जन्मात येणं शक्य नाही. व्यक्ती म्हणून परिपक्वता कधी येणार?' असा खोचक सवालही नीलेश राणे यांनी विचारला आहे.
याशिवाय 'आपण काय करताय, एका टेंडरसाठी. जे आपण सातत्याने म्हणत होतो त्यांचं उदरनिर्वाहचं साधन, वैभव नाईक कुटुंबाचं हे फक्त जिल्ह्यातील टेंडर आहेत. इतरांना टेंडर मिळताय किंवा त्यांना मिळतील, या भीतीपोटी ते आपल्याला मिळणार नाही, म्हणून मारामारी करायची राडा करायचा आणि समोरचे इतर जे काही स्पर्धक किंवा ठेकेदार असतील त्यांच्या मनात भीती तयार करायीच, जर आम्हाला मिळालं नाही टेंडर तर तुम्हालाही मिळू देणार नाही. हे वातावरण अनेक वर्षांपासून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. आपल्याला म्हणून चांगले रस्ते मिळत नाहीत. हे जे ठरवणार तेच रस्ते होणार, हे जे ठरवणार त्यांनाच टेंडर मिळणार अशा या कचाट्यात आपला जिल्हा अनेक वर्षांपासून अडकला आहे.' अशी टीका राणेंकडून केली गेली आहे.
तर 'यांचं उदरनिर्वाहचं साधनच, रस्ते, डांबर आणि लगतच्या सगळ्या गोष्टी आहेत. व्यवसायासाठी क्रशर, खडी इत्यादी आहेत. यांचा संपूर्ण आयुष्य पूर्ण दिवसच फक्त या ठेक्यांच्या अवतीभोवती जातो. आमदारकी कशासाठी हवी, कारण मग ठेके मिळतील. ठेक्याववर उदरनिर्वाह त्यावर राजकारण आणि बदनाम करायचं इतरांना. हे डाव आता लोकांनी ओळखलेले आहेत. लवकरच वैभव नाईक(Vaibhav Naik) तुम्हाला योग्य जागा लोक दाखवतील आणि तुम्हाला या जिल्ह्यात एक साधा ठेका देखील मिळणार नाही. याची काळजी देखील लोक घेतील.' असा इशारा नीलेश राणेंकडून दिला गेला आहे.
तसेच, 'कारण, या वृत्तीची लोक जे दुसऱ्यांवर दहशतवादाचा आरोप करतात, आज स्वत: तुम्ही काय करताय, कशासाठी करताय?, स्वत:चा उदरनिर्वाह, बँक बॅलन्स तयार करण्यासाठी. हा कुठलाही पक्षासाठी राडा नव्हता फक्त टेंडर नाईक कुटुंबाला मिळावं, म्हणून अख्ख नाईक कुटुंब तिकडे होतं, त्यांचा जो काही मित्र परिवार होता, त्यांना ते टेंडर मिळावं यासाठी केलेला हा राडा होता.'
'हे लोकांना १०० टक्के आता कळलेलं आहे की वैभव नाईक ना सहकाऱ्यांसाठी काही करतात, ना पक्षासाठी काही करतात, ना उद्धव ठाकरेंसाठी(Uddhav Thackeray) काही करतात. यांचा सगळा राजकारणाचा भार, त्यांचा अख्खा दिवस हा फक्त ठेके आणि मला काम किती मिळणार, मला किती रुपयांचं टेंडर मिळणार यासाठीच वैभव नाईक आणि त्यांचं कुटुंब हे मागील दहा वर्षे सिंधुदुर्गाला लुटत आहेत.' अशा शब्दांमध्ये नीलेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांवर जोरदार टीका केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.