Shivaji Maharaj Statue Collapsed : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या आमदाराची चौकशी होणार; पोलिसांनी धाडली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Sindhudurg police have sent a notice to Vaibhav Naik : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला होता.
Vaibhav Naik, Uddhav Thackeray
Vaibhav Naik, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News, 26 Sep : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला होता.

मालवणमधील पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणे यांच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही नाईक यांनी केला होता. तसेच कोट्यवधी खर्च दाखवला पण केवळ 26 लाख रुपये पुतळ्यासाठी वापरल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मात्र, आता त्यांनी केलेल्या याच आरोपांमुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg) वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे जे प्रकरण घडले. या गुन्ह्याचा आम्ही तपास करत आहोत. या संबंधित चौकशीसाठी तुम्ही पत्रकार परिषदेत या प्रकरणा संबंधित जे भाष्य केलं आहे.

Vaibhav Naik, Uddhav Thackeray
Shivaji Maharaj Statue Collapsed : शिवरायांचा पुतळा कोसळला, फडणवीसांची कबुली?

त्याच्याशी संबंधित तुमच्याकडे असणारे पुरावे आम्हाला देऊन सहकार्य करावे, अशी विनंतरी पोलिसांनी या नोटीसमध्ये केली आहे. त्यामुळे आता राजकोटमधील पुतळा कोसळ्याप्रकरणी वैभव नाईक यांची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.

वैभव नाईकांनी केलेले आरोप

- शिल्पकार जयदीप आपटेला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी एकूण 26 लाख रुपये दिले. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जिल्हा नियोजनमधून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला.

- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेंच्या (Narayan Rane) लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का वापरला? नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकलं आहे, असे गंभीर आरोप नाईक यांनी केले होते.

Vaibhav Naik, Uddhav Thackeray
Sanjay Raut : मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; कोर्टाने ठोठावली शिक्षा

दरम्यान, आता या पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या चौकशी समितीने एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात मालवणातला महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणे दिलेली आहेत. तसेच त्याच संदर्भात आता आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि राणे यांच्यात आरोपाच्या फैरी सुरु होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com