Nitesh Rane and Manoj Jarange-Patil Sarkarnama
कोकण

Nitesh Rane News : 'जरांगे पाटलांची स्क्रिप्ट येते कुठून?, या सगळ्याला आता 'तुतारी'चा..' ; नितेश राणेंचं मोठं विधान!

Mayur Ratnaparkhe

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवाय, 'मी मुंबईला सागर बंगल्यावर येतो आहे, तुला माझा बळी घ्यायचा आहे घे.' असं म्हणत जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. तर जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनीही एक मोठं विधान केलं आहे.

'जरांगे पाटील यांच्या भाषणाची स्क्रिप्ट नेमकी येथे कुठून असा खडा सवाल करत या सगळ्याला आता तुतारीचा वास येऊ लागला आहे.' असाही टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. सागर बंगल्याच्या बाहेर एक भिंत आहे आमची, आम्ही उभे आहोत ती आधी पार करा. असेही थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणाला आता राजकारणाचा वास येऊ लागला आहे. असेही नितेश राणे(Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'स्क्रिप्ट वाचून दाखवण्याचं काम मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) करतात. तुम्हाला मराठा समाजाचे नेते बनायचे, तुम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर मग तुम्ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का करता? शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांची नावं का घेतली जात नाहीत? त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला आता राजकारणाचा वास यायला लागला आहे. त्यामुळे आजवरची ही स्क्रिप्ट नेमकी कोण पाठवत होत हे लवकरच कळेल.' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी? असा टोला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. जरांगे पाटील यांना या संपूर्ण प्रकरणाची स्क्रिप्ट नेमकं कुठून येते हे लवकरच कळेल असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत सरकार कधी ना कधीतरी तोडगा काढेल. परंतु या निमित्ताने फडणीसांना(Devendra Fadnavis) टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे.त्यामुळे सागर बंगल्याच्या बाहेर आम्ही देखील आहोत आमची एक भिंत असेल त्याचा विचार जरांगेंनी करावा. पहिल्यांदा आमची भिंत पार करा आणि नंतरच सागर बंगल्यावर पोहोचा. असं थेट आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिलं आहे.

इम्तियाज जलील यांच्यावरही टीका -

इम्तियाज जलील यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ' ज्याच्या नावातच जलील आहे, त्याला अजून किती जलील करायचं हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. हिंदू समाजाच्या हातात तुमचा नाडा आहे ज्या दिवशी समाज तुमचा नाडा खेचेल त्यादिवशी पायजमा घालायच्या पण लायकीचे राहणार नाहीत.

यापुढे गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या सभा उधळून लावण्यात येतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला कळतील, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे. जर भारतात जन्म झाला असेल आणि राहत असशील तर भारत माता की जय आणि जय श्रीराम म्हणून दाखव. इथे वंदे मातरम्, भारत माता की जय बोल मग आम्ही तुझं रक्त हिरवं आहे की भगवं हे पाहू.' असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT