Nilesh Rane Vs Nitesh Rane sarkarnama
कोकण

Nitesh Rane : थोरल्या भावाचा जिव्हारी लागणारा सल्ला धुडकावला : नितेश राणेंचा निलेश राणेंवर 'Tax Free' पलटवार

Nilesh Rane Vs Nitesh Rane : भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी सत्तेत मंत्री झाल्यापासून वादग्रस्त विधान करण्याचा सापाटाच लावला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसापासून अनेकदा विविध विधाने केली आहेत. ज्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नंतर सावरासावर करावी लागली आहे.

Aslam Shanedivan

Shindhudurg News : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना आमने-सामने आली आहे. नितेश राणेंच्या अशा वक्तव्यामुळे महायुतीतच तडे जातील की काय? आता अशी स्थिती निर्माण होताना दिसत आहे. मंत्री नितेश राणे यांनी : ‘सगळ्यांचा बाप...', असे वक्तव्य काढल्याने मोठे बंधु तथा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांना असा सबुरीचा सल्ला दिला आहे. पण हा सल्ला मानतील ते नितेश राणे कसले. त्यांनी मोठ्या भावाला देखील आक्रमक होण्याचा सल्ला दिली आहे. त्यांच्यातील या ट्विटवॉरची सध्या राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.

सगळ्यांचा बाप....

धाराशिवमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी ‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे सूचक इशारा दिला होता. तर हा इशारा खासकरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होता, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांनी शिवसेनेला शिंगावर घेतल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले होते. तर या वक्तव्यानंतर महायुतीतील घटक पक्षातील नाराजी समोर आली होती. ज्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण देत पडदा टाकावा लागला होता.

यानंतर आता मोठे बंधू आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांचे एक ट्विट समोर आले आहे. ज्यात त्यांनी नितेश राणे यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'नितेशने जरा जपून बोलावं... मी भेटल्यावर बोलेन पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे कान टोचले आहेत.

एकीकडे मोठ्या भावाने राजकारणातील बारकावे माहित असल्याने सबुरीचा सल्ला देत कानमंत्र दिला आहे. मात्र शांत राहतील ते नितेश राणे कसले त्यांनी आपल्या मोठ्या बंधुंच्या ट्विटला प्रतिसाद देत टोलाही लगावत आपल्या सारखं आक्रमक होण्याचे आवाहन केलं आहे. नितेश राणे यांनी,‘निलेशजी तुम्ही आता tax free आहात’, असे म्हटलं आहे.

निलेश राणे यांच्या ट्विट आवाहनास नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिल्याने भाजप-सेनेतील शीतयुद्ध वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण येथील tax free याचा अर्थ आमदार-खासदार यांना कोणत्याही स्वरुपाचा टॅक्स लागत नाही. मध्यंतरी 15 वर्षे 10 वर्षे निलेश राणे कोणत्याही पदावर नव्हते. पण आता तुम्ही आमदार आहात. त्यामुळे तुम्हीही आक्रमक बोलण्यासाठी मोकळे आहात, असा सल्ला दिला असावा, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT