Nitesh Rane : तुळजापुरात पाऊल ठेवताच नितेश राणेंचे मोठे विधान; ठाकरे ब्रँड संपण्याचे थेट कारणच सांगितले

Nitesh Rane Tuljapur statement News : मंत्री नितेश राणे यांनी पाऊल ठेवताच उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर मोठे विधान करीत राज्याच्या राजकारणातून ठाकरे ब्रँड संपण्याचे कारणच सांगत एकत्र येण्याची खिल्ली उडवली.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी पाऊल ठेवताच उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर मोठे विधान करीत राज्याच्या राजकारणातून ठाकरे ब्रँड संपण्याचे कारणच सांगत एकत्र येण्याची खिल्ली उडवली.

राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे ही जरी त्यांची भूमिका असली तरी ठाकरे ब्रँड हा हिंदुत्व सोडल्याने संपला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे अतूट नाते आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडले ते रसातळाला गेले आहेत. त्यामुळे ठाकरे ब्रँड संपण्याचे कारण त्यांनी हिंदुत्व सोडणे हेच असल्याचे राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले.

Nitesh Rane
Tuljapur drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षाच्या पतीला कोर्टाच्या आवारातून नाट्यमयरित्या ठोकल्या बेड्या

येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, 'ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे वीस आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी ठाकरे बंधु युतीची खिल्ली उडवली.

Nitesh Rane
BJP Vs Shivsena : एकनाथ शिंदेंचे टेन्शन भाजपनेच वाढवले, ठाण्यातच घेरण्याची रणनीती; बैठकीत काय घडलं?

आदित्य ठाकरे झेलवारी करणार

दिनू मोरयावरील होत असलेली कार्यवाही व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे प्रकरण झाकण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पावसाळ्यातच आदित्य ठाकरे यांना झेलवारी करावी लागणार असल्याची टीका नितेश राणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली.

Nitesh Rane
NCP Politics : राष्ट्रवादीतील नेत्यांच्या सल्ल्यानुसारच ठाकरेंकडे! के. पी. पाटलांकडून गौप्यस्फोट

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या नितेश राणे यांनी शनिवारी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nitesh Rane
Ajit Pawar News:सायबर भामटा NCPशी जोडला? Tushar Vajantri प्रकरण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com