Suryakant Dalvi-ramdas kadam-yogesh kadam
Suryakant Dalvi-ramdas kadam-yogesh kadam sarkarnama
कोकण

शिवसेनेपेक्षा कोणीही मोठे नाही, हे निकालाने सिद्ध : दळवींचा कदम पिता-पुत्रांना टोला!

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ (जि. रत्नागिरी) : पक्षापेक्षा कोणी मोठे नाही, शिवसेना (shivsena) या चार अक्षरांमुळे स्वतःची ओळख असल्याचे काहीजण विसरले होते. मात्र, दापोली नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने त्यांचा भ्रम दूर केला आहे, अशा शब्दांत नगरपंचायत निवडणुकीची शिवसेनेची सूत्रे सांभाळणारे माजी आमदार सूर्यकांत दळवी (suryakant dalvi) यांनी माजी मंत्री रामदास कदम (ramdas kadam) आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (yogesk kadam) यांना टोला लगावला. (No one is bigger than Shiv Sena: Suryakant Dalvi's criticizes kadam father and son)

दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या विजयानंतर माजी आमदार दळवी बोलत होते. ते म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आदेश दिले. मात्र, माझ्यापेक्षा या मतदार संघात कोणी मोठा नाही, असा भ्रम अनेकांना झाला होता. त्यांचा तो भ्रम येथील मतदारांनी दूर केला आहे. अजूनही वेळ गेली नाही. पक्षामध्ये योग्य पद्धतीने कार्यरत व्हा, असा संदेश आपण सर्वांना या निमित्ताने देऊ इच्छितो, असेही त्यांनी सांगितले.

दळवी म्हणाले की, दापोलीकरांच्या विकासात आपण कधीही कमी पडलो नाही. नगरपंचायतीची स्थापना ही आपल्या पुढाकाराने झाली होती, त्यामुळे विकासकामे व दापोलीचे स्वच्छ आणि सुंदरतेचे स्वप्न यापुढील काळात निश्‍चितच पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.

‘‘आगामी काळात दापोली तालुक्याचा दौरा आपण करणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका याच ताकदीने लढवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे,’’ असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सांगितले.

काहीजण भ्रमापोटी प्रवाहाबाहेर

तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी आल्यानंतर पहिली निवडणूक आम्ही यशस्वीपणे जिंकलो असून जे निष्ठावान कार्यकर्ते पक्षासोबत राहिले, त्यांचे आपण आभार मानतो. काहीजण भ्रमापोटी प्रवाहाबाहेर गेले असून त्यांनी किंतु, परंतु मनात न ठेवता पुन्हा पक्षाच्या प्रवाहात सामील व्हावे आणि दापोलीच्या विकासात आपला हातभार लावावा. शिवसेना आहे, म्हणूनच आपली ओळख आहे, हे त्यांनी विसरू नये. कार्यकर्ते इकडून तिकडे गेले तरी मतदार हे शिवसेनेच्या चिन्हालाच प्रिय मानतात, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे ऋषिकेश गुजर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT