अकलूज (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस आणि श्रीपूर-महाळुंग तीन नगरपंचायतीच्या निवडणूक (Nagar Panchayat election) निकालानंतर विजयी उमेदवारांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन गुलालाची मुक्त उधळण करत विजयोत्सव साजरा केला. (Victory celebration at Shivaratna of Akluj after the result of Nagar Panchayat)
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस आणि श्रीपूर-महाळुंग या तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (ता. 19 जानेवारी) करण्यात आली. या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवरत्न बंगल्यावर गर्दी केली होती. विजयी उमेदवारांमध्ये श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत जगदंबा विकास आघाडी व यमाईदेवी विकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या 9 उमेदवारांनी खासदार विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil), जयसिंह मोहिते पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
माळशिरस तालुक्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला ठेवत गटातटाच्या राजकारणाला मतदारांनी कौल दिला आहे. या तीनही नगरपंचायतीच्या एकूण ५१ जागांपैकी भाजप व मोहिते पाटील समर्थकांनी ३८ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रीपुर-महाळूंग नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६, तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा मिळवली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील समर्थक पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीने 5 आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील समर्थक पुरस्कृत यमाईदेवी विकास आघाडीने 4 जागा मिळविल्या. यामुळे भाजपची 12 विकास आघाडीचे म्हणून अशा दहा जागांवर मोहिते-पाटील यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी भाजपचे 10, राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन, तर तीन जागांवर 3 अपक्षांनी विजय मिळविला आहे. नातेपुते नगर पंचायत निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी जनशक्ती विकास आघाडीने 11 जागा, नागरी विकास आघाडी 5, तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे. नातेपुते नगरपंचायतीमधील 17, श्रीपूर-महाळूंगमध्ये 10 आणि नातेपुते नगरपंचायतमध्ये 11 अशा एकूण 38 जागांवर मोहिते-पाटील गटाने वर्चस्व मिळविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.