Operation Tiger; Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Operation Tiger : ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा, 'ते' 7 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? गोगावलेंनी कारणचं सांगितलं

Bharat Gogawale On Operation Tiger Uddhav Thackeray MPs : राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली असून ठाकरेंचे खासदार शिवसेनेबरोबर का जाणार याचे कारणच शिंदेंच्या शिलेदाराने स्पष्ट केले आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नेत्यांची वक्तव्य समोर येत असतानाच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी मोठे विधान केले आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जूनला) मातोश्रीवर खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व घडामोडीमुळे राज्यातील राजकारण तापले असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी 'ते' 7 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार? याचे कारणचं सांगितले आहे.

गेल्या काही दिवसापासून 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर दररोज नव नवे दावे केले जात असून दिल्लीत एनडीएची बैठक पार पडल्याचे बोलले जात आहे. तर याच बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

ज्यावर शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी मोठा दावा केला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे कबुली दिली. यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

अशातच भरत गोगावले यांनी या खासदारांच्या शिवसेना प्रवासावर भाष्य समोर आलं आहे. त्यांनी, आता मला वाटतं नाही की ते खासदार आता थांबतील. या खासदारांनी निर्णय घेतला असून बहूतेक त्यांच्या डोक्यावरून आता पाणी गेलं आहे. आणि काही दिवसांनंतर हे प्रत्यक्षात पाहायला मिळेल. ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान ठाकरे बैठक घेणार या वृत्तावर बोलताना गोगावले म्हणाले की, आता त्यांनी मीटिंग घेवो की आणखी काही करो. पण त्या 7 खासदारांनी निर्णय पक्का केला आहे. यामुळे ते 7 खासदार लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT