Raigad News : राज्यात एकीकडे भीषण दुष्काळाच्या झळा बसत असताना, दुसरीकडे मात्र नवी मुंबईनंतर आता भाजपची सत्ता असलेल्या पनवेल महानगरपालिकेत वर्धापन दिनाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरून आता यावरून आता वादाची ठिणगी पडली असून शेकापचे स्थानिक नेते तथा विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी मोठा आरोप केला आहे. महापौर बंगल्यावर गरज नसताना कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असताना दुसरीकडे नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या प्रस्तावित अमेरिका अभ्यास दौऱ्यावरून नवा वाद सुरू झाला.
या दौऱ्यासाठी सुमारे २८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यावरून राजकीय चर्चा सुरू झाली असून विरोधकांकडून देखील विरोध होताना दिसला होता. विरोधकांनी अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून परदेशातील नागरी व्यवस्थेचा अभ्यास करण्यास विरोध नाही. पण तो महापालिकेच्या निधीतून खर्च करण्याऐवजी संबंधितांनी स्वतःच्या खर्चाने करावा अशी मागणी केली होती. तसेच प्रस्तावित २८ लाख रुपयांचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी केली होती.
हा वाद अद्याप शांत झाला नसतानाच असाच कित्ता पनवेल महानगरपालिकेनं गिरवला आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालिकेकडून भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. तर या वर्धापन दिनासाठी नावाखाली २ ते ३ कोटी रुपये उधळले जातील असा आरोप आता विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. तसेच म्हात्रे यांनी, महापौर बंगल्यावर गरज नसताना कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा देखील आरोप केला आहे.
म्हात्रे यांनी, आधी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महापौर निवासस्थानाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. आणि आता वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपकडून ही उधळपट्टी सुरू केली जात आहे, असा दावा केला आहे.
विशेष म्हणजे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. एकीकडे रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपये उधळले जात असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी देखील या उधळपट्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.