Kalyan Dombivli Municipal Corporation Sarkarnama
कोकण

KDMС News : कोट्यवधींच्या उधळपट्टीवर पनवेल महानगरपालिका ट्रोल होताच केडीएमसीचा आदर्श निर्णय; 25 लाख रुपये दुष्काळग्रस्तांसाठी

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिकेच्या उधळपट्टीवरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर कार्यक्रमात मोठी कपात करत खर्चाला ब्रेक लागला आहे.

Aslam Shanedivan

Kalyan Dombivli Municipal Corporation News : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला १ ऑक्टोबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्तीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि नागरिकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर या विविध कार्यक्रमांवर २-३ कोटी रूपयांची उधळपट्टी होणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

या आरोपावरून राळ उठल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने सावध पवित्रा घेतला. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर यंदा मोठे कार्यक्रम टाळून साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला. तसेच बचत निधीतून २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर हर्षाली चौधरी यांनी दिली आहे. सध्या महापालिकेच्या या आदर्श निर्णयाची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून महायुतीचे सरकार देखील बांधावर गेले आहे. राज्यात तब्बल २६५ तालुक्यात ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. तर यात आणखी आणखी १९ तालुक्यांचा समावेश केला जाणार आहे.

एकीकडे राज्यभर दुष्काळाची स्थिती असताना पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या औचित्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा मुद्दा समोर आला होता. ज्यावरून महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेत्यानेच गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर महापालिकेने दशकपूर्तीच्या खर्चाला ब्रेक लावत साधेपणानेच कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. १ ते १९ ऑक्टोबरदरम्यान स्वतंत्रपणे नियोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आता एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. यामुळे विविध कार्यक्रमांवरील अतिरिक्त खर्चाला आळा बसणार आहे.

महापालिकेच्या अनावश्यक खर्च टाळण्याच्या निर्णयानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा महापौर हर्षाली चौधरी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT