Sindhudurg News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावरील कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा डिसेंबरमध्ये असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याआधी १ ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर आता मोदी डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याने यासंदर्भाने मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदल आणि राज्य सरकारच्यावतीने मोदींच्या या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबरला नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही अनावरण मोदींच्या हस्ते होणार आहे. मोदींच्या डिसेंबरमधील या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.