Delhi G20 Summit News: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; सप्टेंबर महिन्यात तीन दिवस दिल्ली बंद राहणार

Delhi Shut for 3 Days News: दिल्लीत सप्टेंबर महिन्यात जी 20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्लीत सप्टेंबर महिन्यात जी 20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8, 9 आणि 10 सप्टेंबरला ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याने या परिषदेसाठी जवळपास 25 पेक्षा जास्त देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. या पार्श्वभूमीवरच दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेत 8, 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्ली बंद ठेवण्यात येणार आहे.

जी 20 परिषदेची बैठक असल्याने या तीन दिवसांत दिल्ली सरकारची प्रशासकीय कार्यालये, दिल्ली महापालिकेची सर्व कार्यालय तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना देखील तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 25 पेक्षा जास्त देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या तीन दिवसांच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Arvind Kejriwal
Amravati Politics News: साहेब तुम्ही उमेदवार द्या, आम्ही जिंकून आणू; ठाकरेंना अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांचा शब्द

या तीन दिवसांच्या कालावधीत दिल्लीतील बस सेवा बंद असणार आहे. याबरोबरच दिल्लीतील सर्व खाजगी कंपन्यांची कार्यालये, दुकान, हॉटेल्स देखील बंद राहणार आहेत. तसेच या तीन दिवसांत सर्वसामान्य नागरिकांनाही दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. मेट्रे स्टेशन देखील बंद राहणार असून या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच मोठी तयारी करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal
Rajasthan Politics : राजस्थानमध्ये भाजपची दोन सप्टेंबरपासून परिवर्तन यात्रा; २०० विधानसभा मतदारसंघात पोहोचणार

जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठी 'व्हीआयपी मुव्हमेंट' असणार आहे. त्यामुळे 8 ते 10 सप्टेंबर या तीन दिवसाच्या काळात दिल्लीतील विविध ठिकाणच्या वाहतुकीत देखील बदल करण्यात येणार आहेत. या कालावधीत दिल्लीकरांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com