Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना आता कसली चिंता? थेट मनसेच्या जिल्हाध्यक्षानेच धरली छत्री? नेमकं कारण काय?

MNS District President Defection: रत्नागिरीत मनसेच्या 'एक समाज एक संघ क्रिकेट स्पर्धे'च्या दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी राजकीय फटकेबाजी केलीय. ज्याची सध्या खमंग चर्चा सुरू झाली आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri Political News : ठाकरे सेनेचे कोकणातील फायर ब्रँड नेते भास्कर जाधव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद मागणी आणि ते न मिळाल्याने संसदेत सत्ताधाऱ्यांना फटकारल्याने ते चांगले चर्चेत आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गुहागर येथे त्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी सध्या रत्नागिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

रत्नागिरीत मनसेच्या 'एक समाज एक संघ क्रिकेट स्पर्धे'च्या दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी मैदानात हजेरी लावली. यावेळी मसनेकडून भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी छत्री भास्कर जाधव यांच्या डोक्यावर धरली. पण ही छत्री मनसेची होती. यामुळेच सध्या अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान भास्कर जाधव यांनी, गांधी यांनी माझ्यावर छत्री धरली यावरून सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. कोण कोणाच्या छत्री खाली गेला? आता असं जिल्ह्यात बोललं जाईल. पण कोण काय बोलतं याला महत्व नाही. त्यांनी छत्री धरली नाही, तर मीच त्यांच्या छत्री खाली गेलोय. त्यामुळे कितीही वादळ वारे आले तरी मला आता कसलीही चिंता नाही, असा विनोदी चिमटा भास्कर जाधव यांनी काढला आहे.

तसेच भास्कर जाधव यांनी प्रमोद गांधी यांनी अशी भव्य दिव्य स्पर्धा भरवून सर्व समाजाला संघटित करण्याचे काम करत त्यांना एका छता खाली आणलं आहं. त्यांच्या या कार्याचे आपण अभिनंदन करत असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.

गुहागर तालुक्यात खेळासाठी मैदान नसून जर संबंधित मालकांनी ही जागा खेळासाठी दिल्यास येथे भव्य स्टेडियम उभारू असेही आश्वासन भास्कर जाधव यांनी दिली असून स्टेडियम लागत त्यांचेच नाव देऊ अशी ही घोषणा केली.

भास्कर जाधवांची तारेवरची कसरत

दरम्यान सध्या कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत झाली आहे. येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा कोर मतदार अद्याप त्यांच्या पाठिशी उभा असलेला आता गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या कार्यक्रमातून दिसून येत आहे.

मात्र ठाकरेंकडे विश्वासू शिलेदार नसल्याने याचा फटका आता शिवसेना बसत आहे. तर जे चेहरे आहेत. त्यांना ठाकरे गटात थांबवण्याची तारेवरची कसरत भास्कर जाधव यांच्यासह माजी खासदार विनायक राऊत आणि कोकणातील काही प्रमुख नेत्यांना करावी लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT