Bhaskar Jadhav Vs Ajit PAwar : लक्षवेधीसाठी सत्ताधारी आमदार पैसे देतात, भास्कर जाधव बोलले अन् अजितदादा भडकले, नेमकं काय घडलं?

Bhaskar Jadhav Ajit pawar Assembly Session: लक्षवेधी मांडण्यासाठी अध्यक्षाच्या कार्यालयात जाऊन सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना किती पैसे घेणार, असे विचारल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
Bhaskar Jadhav Ajit pawar
Bhaskar Jadhav Ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Jadhav News : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधीसाठी सत्ताधारी आमदार विधानसभा अध्यक्षाच्या ऑफीसात जाऊन अधिकाऱ्यांना लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे असं विचारलं, असे म्हटले. तसेच त्यासाठी त्यांनी एका वर्तमानपत्राचा हवाला देखील दिला. जाधवांच्या या खबळजनक वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाधव यांना उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, 'भास्कर जाधवांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष असताना हे अशा प्रकारे बोलणं कितीपत योग्य आहे? हे रेकाॅर्डवरून काढून टाकावं. जर त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं. त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटावे. काही असेल तर त्यांना सांगावं.'

Bhaskar Jadhav Ajit pawar
Uddhav Thackeray : विधिमंडळ परिसरातून मोठी बातमी: पुन्हा दिशा सालियनचा मुद्दा अन् ठाकरे भडकले; म्हणाले,'हरामखोर आहेत ते...'

'आम्ही सरकार चालवतो. आम्ही असल्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी बसलो नाही. लोकांनी त्याच्या करता पण आम्हाला निवडून दिलेलं नाही. जे ते बोलले आहेत त्यात तथ्य आहे की नाही? त्याची चौकशी केली की नाही? पुरावे आहे की नाही? जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथे आपण कामावरून काढून टाकू. त्याच्यावर अ‍ॅक्शन घेऊ.', असे देखील अजित पवारांनी सभागृहात सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय नाही

विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय या अधिवेशनात होईल, अशी चर्चा होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांचा नाव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आले होते. जाधव यांच्या नावाला महाविकासा आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील पाठींबा दिला होता. मात्र, आज विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य करताना "त्यांना काही काळं मोकळं बसू देऊ या" , असे वक्तव्य करून या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार नसल्याचे संकेत दिले.

Bhaskar Jadhav Ajit pawar
Ajit Pawar News : पुरोगामी भूमिका जपताना होतेय अजितदादांची दमछाक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com