
Ratnagiri News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील संपले असून अद्याप विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. मात्र ते कोणत्या कारणामुळे नियुक्ती झाली नाही याचे कारण आता समोर आले आहे. भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखत डाव टाकल्याचे आता समोर आले आहे. तर भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये आणि ते गुहागरमध्येच अडकून पडावेत असे आव्हानच शिंदे यांनी तेथे उभे केलं आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण ते मिळू नये यासाठी शिंदे शिवसेनेकडून फिल्डिंग लावण्यात आली होती, अशी सध्या चर्चा रंगली आहे. तर त्यांना त्यांच्यात मतदार संघात अडकून ठेवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागरमध्ये पाठवल्याची चर्चा सुरू आहे.
कदम यांच्यावर गुहागर विधानसभा मतदार संघाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्यासाठी डाव टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणाने ठाकरेंच्या मागे ठाम ताकद लावली. पण गेल्या काही वर्षात येथे चित्र बदलले असून भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यातच शिवसेनेच्या फुटीमुळे शिवसैनिकच विभागला गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुरूंग लावला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेकडून पक्षबांधणी सुरू झाली आहे. तर कोकणात ऑपरेश टायगरमधून शिंदेंनी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी, संजय कदम या बड्या चेहऱ्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढले आहे. शिंदेंकडून संघटनात्मक बदलावर भर देताना दुसऱ्या पक्षांतील पॉवरफुल नेत्यांना शिवसेनेत खेचले आहे.
या दरम्यान महाविकास आघाडीने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेसाठी भास्कर जाधव यांचे नाव जाहीर करत कोकणात ठाकरे गटाला बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधवांना बळ मिळाल्यास एकाआर्थी त्याचा परिणाम शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर होईल, या भीतीने शिवसेनेकडून जाधवांच्या नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा सुरू आहे.
जाधव यांनी कोकणातच आडकवून ठेवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदेंच्या मेहुणे विपुल कदम यांनाच मैदानात उतरवले आहे. गुहागर मतदार संघात त्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे आगामी काळात विपुल कदमांची ताकद वाढणार असून याचा थेट परिणाम जाधव यांच्यावर होणार आहे.
एकीकडे जाधवांची ताकद कमी करण्यासाठी विपुल कदमांना शिंदे ताकद देत असून त्याला रामदास कदमांचा विरोध असल्याचे याआधीच विधानसभा निवडणुकीवेळी समोर आले होते. त्यावेळी विपुल कदमांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र रामदास कदमांनी मोठा विरोध केल्याने ऐनवेळी राजेश बेंडल यांना उमेदवारी द्यावी लागली होती. पण त्याचा पराभव पराभव झाला होता.
दरम्यान या मुद्द्यावर भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआने माझे नाव सांगितले होते. याबाबत मी देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संयम ठेवून होतो. पण त्यावर माझ्या नावाची अडचण असेल तर मी माघार घेतो; पण रिक्त असलेले हे पद भरा, अशी विनंती केली होती. पण कोणताच निर्णय अध्यक्षांनी घेतला नाही, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. बहुमताच्या बळावर सर्व नियम व कायदे पायदळी तुडवून सरकार चालवण्याचे काम सुरू असल्याची टीका जाधव यांनी यावेळी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.