महेंद्र दळवी यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेनंतर रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तणाव चिघळला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात 20-25 गाड्यांचा ताफा महाड शहरात दाखल झाला.
म्हात्रे यांनी थेट देशमुख यांना इशारा देत शिवसेना कार्यकर्त्यांच्या अपमानास उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Raigad News : रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा वाद उफाळला आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेनंतर येथील वाद वाढला असून खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी पलटवार केल्यानंतर या वादात तेल पडले आहे. देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर येथे संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो समर्थकांनी महाड शहरात प्रवेश केला आहे. फक्त प्रवेशच केला नाही तर 20-25 गाड्यामधून सिनेस्टाईलने महाडमध्ये एंट्री केल्याने तणाव वाढला आहे.
राज्यातील महायुती अधिक भक्कम करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहे. पण रायगडमध्येमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीशी युती नाही असा पवित्रा घेतला होता. त्यांच्यापाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांनी देखील तटकरेंवर टीका करताना युतीबाबत वक्तव्य केलं होते. त्यावरून येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वार-पलटवार होताना दिसत आहे.
तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील वाद तणाव आणखी चिघळला असून राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते देशमुख यांनी केलेल्या टीकेवरून नवा वाद सुरू झाला आहे. या टीकेनंतर आता दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी महाड गाठले आहे. येथे 20 ते 25 गाड्यांच्या ताफ्यासह जावून देशमुख यांना थेट इशारा देण्यात आला आहे. म्हात्रे यांनी “आम्ही राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे केलेले हल्ले सहन करणार नाही” असा इशाराच दिला आहे. यामुळे सध्या येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
यादरम्यान, एकीकडे तटकरे यांच्याविरोधात आमदार थोरवे आणि दळवी असा सामना रंगला असतानाच आता म्हात्रे विरूद्ध देशमुख असा सामना रायगडमध्ये सुरू झाला आहे. तर याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजा केणी यांनी देखील राष्ट्रवादीचे देशमुख यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली होती. तसेच थेट आव्हानच दिले होते. यानंतर आता सिनेस्टाईलने शिवसेनेनं महाडमध्ये घुसून अशा पद्धतीने राष्ट्रवादीला अंगावर घेतल्याने रायगडमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले होते दळवी
सुनील तटकरे हे ब्लॅकमेलर आहेत. ते नेहमीच ब्लॅकमेलिंग करतात. त्यांनी रायगडमधील अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेतं, असा घणाघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी केला होता. ज्यानंतर रायगडमध्ये नव्या वादाला तोंड फुटले होते. तर हा वाद शिवसेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या राजीव साबळे यांच्या माणगावमधील शिक्षण संस्थेतील एका शाळेवरून सुरू झाला. साबळे यांच्या या शाळेला आधी मंत्री भरत गोगावले यांच्या आईचे नाव द्यायचे ठरले होते. पण ऐन वेळी नाराज झालेले साबळे राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सुनील तटकरे यांच्या आईचे नाव त्या शाळेला दिले.
काय म्हणाले देशमुख :
दळवी यांनी टीका केल्यानंतर देशमुख यांनी पलटावर करताना, सन 1992 पासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे. सुनिल तटकरेंच्या पायाला हात लावून जे मोठे झाले, त्यांनी तटकरे यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा याहीपेक्षा परखड शब्दात उत्तर दिले जातील. हा डोंबाऱ्याचा खेळ थांबवावा, तुमच्यावर 498 दाखल आहे. आता आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायला लावू नका, असे म्हणत देशमुख यांनी दळवी यांना इशारा दिला होता. त्यानंतर आता महाड येथे जाऊन देशमुख यांना दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी दम भरला आहे.
प्र.१: रायगड जिल्ह्यात वाद कशामुळे निर्माण झाला?
उ: आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला.
प्र.२: संजय म्हात्रे कोण आहेत?
उ: ते युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार महेंद्र दळवी यांचे भाचे आहेत.
प्र.३: महाडमध्ये काय घडलं?
उ: संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात 20-25 गाड्यांचा ताफा महाड शहरात दाखल झाला आणि देशमुख यांना इशारा देण्यात आला.
प्र.४: या घटनेमुळे राजकीय वातावरण कसं झालं आहे?
उ: रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव आणखी चिघळला आहे.
प्र.५: शिवसेनेची पुढील भूमिका काय असू शकते?
उ: शिवसेना नेतृत्वाने या प्रकरणात ठाम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.