NCP Vs Shivsena : शिंदेंचा आमदार तटकरेंवर तुटून पडला, राष्ट्रवादीचा नेताही भडकला; म्हणाला, 'आम्हाला शिवसेनेची गरज नाही'

dispute between MLA Mahendra Dalvi And sunil tatkare : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महायुती नव्हे तर फक्त भाजपशी युती असे म्हणत रोहा येथे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर जोरदार टीका केली होती.
MLA Mahendra Dalvi And sunil tatkare
MLA Mahendra Dalvi And sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रोहा येथे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टीका करत महायुतीऐवजी फक्त भाजपसोबतची युती महत्त्वाची असल्याचे म्हटले.

  2. दळवींच्या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भरत भगत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.

  3. भगत यांनी स्पष्ट केले की, शिंदे सेनेसोबत युती करण्याची राष्ट्रवादीला अजिबात गरज किंवा इच्छा नाही.

Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राजकीय मतभेद चिघळताना दिसत आहेत. आमदार महेंद्र दळवी यांनी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर येथील राजकीय वातावरण आणखी चिघळले आहे. दळवी यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, “हाथी चले बाजार, कुत्ते भुके हजार” असे म्हणत आम्हालाही 'शिवसेनेची गरज नाही' असे म्हटले आहे. या दोन्हीकडील अशा वक्तव्यांमुळे आता महायुतीच्या भवितव्याला तडा जाण्याची शक्यता आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्य पातळीवर तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असून आगामी स्थानिक देखील महायुती म्हणूनच समोरे जाण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसाच दुजोरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिला आहे. पण स्थानिक पातळीवर स्थानिकच्याआधीच तीव्र वाद होताना दिसत आहे.

दळवी यांनी रोहा येथील कार्यक्रमात, आमागी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीबरोबर कधीच युती होणार नाही. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत. त्यांचे कामच फसवणूक करणे असल्याचा घणाघाती आरोप करताना तटकरेंच्या राजकीय कुरघोड्यांवर हल्लाबोल केला होता.

MLA Mahendra Dalvi And sunil tatkare
Shivsena Vs NCP : 'तटकरे हे रायगड अन् महाराष्ट्राला फसवणारे नेते', मित्रपक्षाच्याच आमदाराने राजकीय कुरघोड्यांचा पाढाच वाचला

या वक्तव्यानंतर आता रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणावाचे वातावरण असून भगत यांनी दळवींवर पलटवार केला आहे. भगत यांनी टीका करताना, “हाथी चले बाजार, कुत्ते भुके हजार” या उक्तीप्रमाणे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी भुंकले आहेत. त्यांनी आधी आपला पूर्वतिहास बघावा. ते शेकापचे सरपंच होते. त्यांचा खरा चेहरा शेकापने ओळखला अन् त्यांना बाजूला केलं. त्यानंतर दळवींनी सुनील तटकरेंचे पाय पकडून राजकारणात स्थिरता मिळवली. त्यामुळे अशा वक्तव्यांचा राष्ट्रवादीवर अथवा तटकरेंवर काहीही परिणाम होणार नाही.

यावेळी भगत यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदावर भाष्य करताना, “हे लोक राष्ट्रवादीला वगळून राजकारणाच्या गप्पा करतात. आम्हालाही शिंदे सेनेची गरज नाही आणि त्यांच्या सोबत राजकारण करण्याची इच्छा देखील नाही. दळवी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भगत यांच्याकडून राष्ट्रवादीचे मत देखील समोर आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीतील समन्वय राखता आलेला नसल्याचे या वादावरून समोर आले आहे. तसेच आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही एकला चलो रे च्या भूमिकेत दिसत आहे.

MLA Mahendra Dalvi And sunil tatkare
NCP Vs Shivsena Politics : स्थानिक निवडणुकांपूर्वी तटकरेंचा मास्टर स्ट्रोक! गोगावले-थोरवेंच्या मतदारसंघातच उतरवले कट्टर विरोधक

FAQs :

प्र.१: महेंद्र दळवी यांनी काय वक्तव्य केले?
उ: त्यांनी महायुती नव्हे तर फक्त भाजपशी युती महत्त्वाची असल्याचे सांगत तटकरेंवर टीका केली.

प्र.२: भरत भगत यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ: त्यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीला शिंदे सेनेसोबत युती करण्याची काही गरज नाही.

प्र.३: हा वाद कुठे उफाळला?
उ: रोहा येथे झालेल्या राजकीय कार्यक्रमात हा वाद उफाळला.

प्र.४: या वादाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
उ: अंतर्गत मतभेद वाढल्याने महायुतीतील समन्वय बिघडण्याची शक्यता आहे.

प्र.५: आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
उ: स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षांमध्ये स्वतंत्र लढती वाढू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com