Raigad News : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अद्याप वाद संपलेला नाही, हेच पुन्हा एकदा समोर आले असून यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी संताप व्यक्त केला आहे.
गोगावले यांनी अनेकदा पालकमंत्रीपदावरून भाष्य करताना आपणच पालकमंत्री होणार असून प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणदेखील आपणच करणार असल्याचे म्हटले होते. तर 15 ऑगस्टच्या आधी पालकमंत्रीपदावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नावाची घोषणा करतील, असा दावा त्यांनी केला होता.
पण आता गोगावले यांनी केलेला एक दावा खरा ठरला असून यंदाच्या स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट रोजी) ध्वजारोहणाचा मान त्यांना देण्यात आला आहे. पण त्यांचा दुसरा दावा पोकळ ठरला असून पालकमंत्रीपदावरून केलेल्या दाव्याचा फुगा फुटला आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून यावर अद्याप कोणतेच अधिकृत वक्तव्य किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.
यावरून आता गोगावले यांनी मनातील सल बोलून दाखवत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून बोलताना, "नक्की काय अडथळा आहे, कुठल्या देवाची नड आहे" हे बघावं लागेल, असे बोलत संताप व्यक्त केला आहे. तसेच यावेळी झालेल्या घोषणेवरून गोगावले यांनी, 15 ऑगस्टला आमच्या हस्ते होणार असून या निर्णयाने मी आनंदी आहे.
परंतु पालकमंत्रिपदाची सर्वांची चर्चा असून यावर पुढच्या दोन दिवसांत निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपण रायगडचे पालकमंत्री म्हणून आगामी १५ जानेवारीला नक्कीच झेंडा फडकवू, असा दावा देखील केला आहे.
तसेच आता ध्वजारोहणाचा आदेश निघाला आहे. पण रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती नाही. कालपासून येथेच असल्याने शिंदे साहेबांना विचारता आलेलं नाही. पण आता हा कार्यक्रम झाला की विचारू. कारण याच्याआधी येथे दोघांमध्ये मला की तुला, असं झालं होतं. पण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीत तो विषय संपला.
पालकमंत्री आम्हालाच देण्याचे ठरलं असून ते मिळेल. पण ते कुठे अडलंय? कोणत्या देवाची नड आहे, हे जरा आता बघावं लागेल. अद्याप दोन दिवस बाकी असून कदाचित निर्णय होऊ शकतो. यामुळे मला पुन्हा एकदा सांगावसं वाटतं की जे ठरलं ते ठरलं असून यात दुसरी कोणतीच अडचण नाही. तरी याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, त्यांनाच विचारून बोलू, असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जवळपास २० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.