Bharat Gogawale : अखेर रायगड, नाशिकचा सस्पेन्स संपला! ध्वजारोहणाचा मान कुणाला? पोलीस कुणाला सलाम ठोकणार? सगळं क्लिअर

Independence Day Flag Hoisting : अखेर भरत गोगावले यांचा दावा खरा ठरला असून रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान त्यांना देण्यात आला आहे.
Independence Day 2026 Flag Hoisting
Independence Day 2026 Flag Hoistingsarkarnama
Published on
Updated on

Raigad/Nashik News : रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांचा दावा खरा ठरला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणेच यंदा १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगडच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण मंत्री भरत गोगावले करणार आहेत. यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणेच आता रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा देखील होणार का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या नावाची घोषणा करतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिकचा देखील निर्णय करण्यात आला असून मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत.

राज्यात महायुतीची सत्ता येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले असून, अद्याप रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपसह शिवसेनेने दावा केला आहे. दोन्हीकडे महायुतीतील मित्र पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असून, वाद होताना दिसत आहे. या वादामुळेच अद्याप पालकमंत्रिपदाचा हा तिढा सुटलेला नसून, आता १५ ऑगस्टला कोण ध्वजारोहण करणार, यावरून चर्चा होताना दिसत आहे.

अशातच गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आजच सुटणार असून, संध्याकाळपर्यंत आपलं नाव जाहीर होईल, असा दावा मंगळवारी (ता. ११) केला. तसेच यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी रायगडचा पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजवंदन करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

Independence Day 2026 Flag Hoisting
Bharat Gogawale : रायगडचा वाद संपला? गोगावलेच पालकमंत्री, 'आपली इच्छा' बोलून दाखवत उदय सामंतांनी तटकरेंना बैठकची आठवण करून दिली

दरम्यान, साम टीव्हीच्या वृत्तानुसार राज्य सरकारने ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालय येथे सकाळी ८.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. तर पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

यावेळी अद्याप पालकमंत्रिपदाचा तिढा न सुटलेल्या रायगड आणि नाशिकमधील ध्वजारोहणाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहण गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, रायगडमध्ये गोगावले ध्वजारोहण करतील, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कोणता नेता ध्वजारोहण करणार -

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे - ठाणे

श्रीमती सुनैत्रा अजित पवार - बीड

चंद्रशेखर प्रभाकती कृष्णराव बावनकुळे - नागपूर

राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील - अहिल्यानगर

हसन सकिना मियालाल मुश्रीफ - नंदुरबार

Independence Day 2026 Flag Hoisting
Bharat Gogawale : शासकीय कार्यक्रमात भाजपचा अजेंडा : भरत गोगावलेंकडून थेट राजीनाम्याची भाषा, तटकरेंचीही नाराजी

चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्छू पाटील - सांगली

गिरीश गिता दत्तात्रय महाजन - नाशिक

गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक - पालघर

गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील - जळगाव

दादाजी रेशमाबाई राजू भुसे - अमरावती

संजय प्रमिला दुलीचंद राठोड - यवतमाळ

उदय स्वरूप रवींद्र सामंत - रत्नागिरी

जयकुमार नयनकुंवर जितेंद्रसिंह रावल - धुळे

श्रीमती पंकजा प्रजा गोपीनाथ मुंडे - जालना

अतुल ललनावती मोरेश्वर सावे - नांदेड

अशोक जनाबाई रामाजी बुडके - चंद्रपूर

शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई - सातारा

आशिष मिन्नल बाबाजी शेलार - मुंबई उपनगर

दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे - वाशिम

शिवेंद्रसिंह अरुणराजे अभयसिंहराजे भोसले - लातूर

जयकुमार कमल भगवानराव गोरे - सोलापूर

नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ - हिंगोली

संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट - छत्रपती संभाजीनगर

प्रताप इंद्रसाबाई बाबुराव सरनाईक - धाराशिव

भरत विठाबाई मारुती गोगावले - रायगड

मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) - बुलढाणा

नितेश निलम नारायण राणे - सिंधुदुर्ग

Independence Day 2026 Flag Hoisting
Bharat Gogawale : रायगडचे राजकीय तापमान वाढले, पालकमंत्रीपदावर गोगावलेंचे सूचक वक्तव्य चर्चेत; 'मला ग्रीन सिग्नल'

आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर - अकोला

प्रकाश सुशीला आनंदस्राव आबीटकर - कोल्हापूर

आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल - गडचिरोली

श्रीमती माधुरी मिरा सतीश मिसाळ - भंडारा

डॉ. पंकज कांचन राजेश भोयर - वर्धा

श्रीमती मेघना दीपक साकारे - बोडीकर - परभणी

इंद्रनील अनिता मनोहर नाईक - गोंदिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com