Mahad municipal election clash : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका निवडणुकीत राड्यात मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांना शरण गेला. दोन दिवस पोलिस कोठडीत राहिला. त्यानंतर जामीन येताच, राजकीय कार्यक्रमांना हजेरी सुरू केली आहे.
एका बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, विकास गोगावले यांनी पुन्हा एकदा विरोधकांना ललकारलं आहे. 'एक केस झाली म्हणून विकास गोगवले गप्प बसणार नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून, मी शरण गेलो,' असे आव्हान देणारं विधान विकास गोगावले यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले महाड नगरपालिका निवडणुकीतील राडाप्रकरणी पसार होते. तब्बल 51 दिवस पसार होता. न्यायालयाने फटकरल्यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर मागच्या दाराने शरण आला. न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.
पोलिस (Police) कोठडीत राहून, गुन्ह्यात विकास गोगावले याने जामीन मिळताच, मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना समज देण्यासाठी बैठक बोलावली. विकास गोगावले देखील बैठकीत सहभागी होते. यात त्यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना, मोठं अन् आक्रमक विधान केलं.
विकास गोगावले म्हणाला, "एक केस झाली म्हणून, विकास गोगावले गप्प बसणारा नाही. विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेचं रक्त आहे. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलात, तर आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून, मी शरण गेलो."
महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, 2 डिसेंबरला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अन् एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तेंव्हापासून सर्व आरोपी फरार होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. दरम्यान गुरुवारी उच्च न्यायालयाने या प्रकरणी सरकार आणि पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढत मंत्री पुत्र विकास गोगावले याला तातडीने हजर करण्याचा आदेश दिला. त्यानंतर दोन्ही बाजूचे आरोपी पोलिसांसमोर हजर झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.