

Jalna District Collector Controversy : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहार प्रकरणात आता पाॅलिटिक्स सुरू झाल्याचं दिसू लागलं आहे. जिल्हाधिकारी यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी या प्रकरणात अंबड अन् घनसांगवी इथल्या तहसीलदारांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. आमदार लोणीकर यांच्या या भूमिकेवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारली असताना, त्यांनी सावध भूमिका मांडली.
मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणावा. त्यावर कारवाई होईल. लोणीकर यांनी हक्कभंग आणल्यास त्याला सभापती अन् अध्यक्ष पाहतील."
तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अनुदानातील गैरव्यवहारात 74 जणांवर ठपका ठेवला होता. परंतु, त्यातील 28 जणांवरच गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत. याकडे लक्ष वेधल्यावर, मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "इथं अभय देण्याचा विषय नाही. जो चुकाचा आहे, त्याला शिक्षाच होईल. दोषारोप पत्राप्रमाणे प्रत्येकावर कारवाई होईल. प्रकरण दाबण्याचे कारण नाही. कुणीही कोणाला अभय देणार नाही." अनुदान घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा होईल, असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिले.
तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी यांचा देखील या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. यावर, 'दोषारोपपत्रानुसार ते दोषी असतील, तर ते जिथे असतील, तिथं त्यांच्याविरोधात कारवाई होईल,' असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली, दोन डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि 72 पानांचा अहवाल तयार केला. या आहवालानुसार यात आरोपी आहेत, अंबडचे तहसीलदार, घनसांगवीचे तहसीलदार, कारण त्यांच्या अकाउंटमधून देखील चोरी झालेली आहे. हा भ्रष्टाचार झालेला आहे. तीन कॅबिनेट मंत्री सांगतात, कायदेशीर कारवाई होईल, कमिशनर सांगतात, कायदेशीर कारवाई होईल, आणि जिल्हाधिकारी पाठीशी घालतात. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तहसीलदारांवर कारवाई न केल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर हक्क भंग आणणार, असे लोणीकर यांनी म्हटले आहे.
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईने जालना चांगलच हादरलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात 24 संशयितांना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार समोर आला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत.चौकशी
चौकशी समितीने 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांच्या सरकारी रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलिस ठाणे अंबड इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.