Mahad election violence : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पसार झालेले पुत्र विकास हे पोलिसांना शरण आले आहे. विकास गोगावले हा पोलिसांना राड्यानंतर सापडत नव्हते. यावरून उच्च न्यायालायने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते.
मंत्र्यांचे पसार असलेले पुत्र, गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहातात. मात्र पोलिसांना सापड नाहीत? अशा शब्दात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर आज हजर झाले आहेत. मात्र, पसार असलेल्या काळात ते कोठे होते, ते कोणाच्या संपर्कात होते, काय करत होते, त्यांना कोण मदत करत होते आदी प्रश्नांमुळे आगामी काळात, राजकीय आणि कायदेशीर वाद वाढणार असल्याचे चित्र आहे.
महाड नगरपालिका निवडणुकीत, दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी मोठा राडा झाला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्य गटात तुफान हाणामारी झाली होती. माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महोश व अन्य कार्यकर्ते यांच्याविरोधात महाड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी करत गुन्हे नोंदवले होते. तेव्हापासून विकास गोगावले हे पसार होते.
विकास गोगावले याला आज न्यायालयासमोर (Court) हजर केले जाणार आहे. विकास गोगावले हा 51 दिवसांपासून पसार होता. यावर उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की, नाही? मुख्यमंत्री या प्रश्नी गप्प का? हे एवढे हतबल झाले आहेत की, ते आपव्याच मंत्र्यांविरोधात बोलू शकत नाहीत? मंत्र्यांची मुले गु्न्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाही?' अशा कडक शब्दात उच्च न्यायालयाने सुनावलं होतं.
विकास गोगावले हा आज सकाळी कोणालाही खबर लागून न देता महाड पोलिसांसमोर मागच्या दाराने हजर झाला. महाड पोलिसांनी विकास गोगावले याला न्यायालयात हजर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाने विकास गोगावले यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला होता. तसेच, त्याच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
विकास गोगावले राड्यानंतर पसार होता. पण तो संपर्कात असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली होती. तसे त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत. पण पसार असल्याचा काळात विकास गोगावले कोठे होता? त्याला कोण मदत करत होते? कलम 307 नुसार दाखल झालेल्या आरोपीला मदत करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार का? पसार असल्याच्या कालावधीत कोठे प्रवास करत होता? रायगड जिल्ह्यातच होता की, बाहेर कोठे होता? उच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेरेंवर पुढे सरकार काय भूमिका घेणार? न्यायालयातील आजच्या सुनावणीत काय होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता समोर येतील. पण त्यानुसार महाड पोलिस तपास करणार का? हा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.