Mayor Election : भाजप हतबल! एकनाथ शिंदेंना नशिबाची साथ, महापौर फिक्स! मनसेची लाॅटरी लागणार?

KDMC Eknath Shinde Shiv Sena MNS : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महापौर पद मिळणार हे फिक्स झाले आहे. मनसेच्या साथीनंतर थेट आरक्षण सोडतीमुळे सगळे चित्र बदलले आहे.
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

KDMC Mayor News : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता थांबलेली दिसत आहे. तब्बल ३१ वर्षांनंतर प्रथमच केडीएमसी महापौर पदासाठी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने सत्तासमीकरणाला नवे वळण मिळाले आहे. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर एसटी प्रवर्गाला महापौर पदाचा मान मिळणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीदरम्यान महायुतीत एकत्र लढलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजप निकालानंतरही युती कायम राहणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत गाठता आले नव्हते.

दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला. या भेटीनंतर खासदार डॉ. शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेला मनसेचा पाठींबा मिळाल्याचा दावा केला. तसेच केडीएमसीत ‘मोठा भाऊ’ म्हणून शिवसेनाच कायम राहील आणि शिवसेनेचाच महापौर बसेल, असा सूचक इशारा त्यांनी भाजपाला दिला होता.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Ambadas Danve News: 'इव्हेंटबाजी' थांबवा, दावोसमधील गुंतवणूक अन्...; अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

या घडामोडींमुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होताच भाजपच्या उरल्या-सुरल्या अपेक्षांनाही पूर्णविराम मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले. कारण एसटी वर्गातून विजयी झालेला उमेदवारच भाजपकडे नाही.

एसटी प्रवर्गासाठी तीन जागांचे आरक्षण पडले होते. त्यापैकी दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. या प्रवर्गातून शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने उमेदवार दिले होते. त्यातील मनसेचा एका आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन एसटी प्रवर्गातील उमेदवार विजयी झाले आहेत.

एसटी प्रवर्गात पॅनल ३-ब मधून हर्षाली थवील यांनी मनसेच्या ज्योती आभाळे यांचा पराभव केला. पॅनल ५-ब मधून किरण भांगले यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या डॉ. धनंजय खोचडे यांचा पराभव केला. तर पॅनल १५-ब मधून मनसेच्या शीतल मंढारी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या तारामती बांगर यांचा पराभव केला. त्यामुळे एसटी प्रवर्गातून शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे.

महापौर पदासाठी एसटी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिंदे सेनेत आनंदाचे वातावरण असून भाजपाच्या गोटात निराशा पसरली आहे. भाजपाकडे एसटी प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने त्यांना आता उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसेला महापौर पदाची संधी?

शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी हर्षाली थवील आणि किरण भांगले यांची नावे चर्चेत असली, तरी मनसेच्या शीतल मंढारी यांचेही नाव आता पुढे येत आहे. मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठींबा देताना काही अटी घातल्याचे समजते. राजकारणाची दिशा कधीही बदलू शकते, असे सूचक संकेत मनसेकडून दिले जात आहेत. तर

कोणाची लागणार वर्णी?

किरण भांगले हे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक असून ते प्रथमच निवडणुकीत उतरले होते. ते अभियंता असून शिवसेनेचे नेते रवी पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. हर्षाली थवील या अनुभवी नगरसेविका असून पालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. महिला महापौर म्हणून त्यांना संधी दिली जाणार का, याकडे लक्ष आहे. मनसेच्या शीतल मंढारी या माजी नगरसेविका असून त्यांनाही पालिकेचा अनुभव आहे. महिला महापौर म्हणून त्यांचाही विचार करून मनसेला सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Parbhani Mayor News: परभणीत महापौर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा की काँग्रेसचा? आरक्षण सोडतीमुळे सस्पेन्स वाढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com