महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
यावेळी सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांनी विकास गोगावले यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप करण्यात आला, आणि ते पिस्तुल नंतर पोलिसांकडे जमा करण्यात आले.
तपासात पिस्तुलचा उगम जम्मू-काश्मीरशी असल्याचे प्राथमिक संकेत मिळताच प्रकरणाने नवे वळण घेतले, आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
Raigad News : नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठा वाद झाला होता. नवे नगर परिसरात मतदान सुरू असताना अचानक हाणामारी झाली होती. येथे माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप गटाचे नेते सुशांत जाबरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर पिस्तुल रोखली होती. जी नंतर पोलिसांकडे जमा करण्यात आली होती. यादरम्यान आता या पिस्तुलचं जम्मू-काश्मीर कनेक्शन समोर आले आहे. ज्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला असून खळबळ उडाली आहे.
मागील काही काळापासून जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्र्वादीत राजकीय संघर्ष सुरू आहे. पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद आता भरत गोगावले आणि सुनिल तटकरे यांच्यातील राजकीय संघर्षापर्यंत गेला आहे. आता हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणखीच तीव्र झाला असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.
ज्यामुळे येथील राजकीय वातावरण तणावाचे झाले होते. अशातच काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. हेच सुशांत जाबरे मतदानादिवशी भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांना भिडल्याचे समोर आले. त्याच्या ड्रायव्हरकडून भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच जाबरेंच्या सुरक्षा रक्षकांनी विकास गोगावले यांच्यावर पिस्तुल रोखली होती.
ज्यानंतर जाबरे यांना भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत वाहनांची तोडफोड केली होती. तसेच हा राडा सुरू असतानाच विकास गोगावले यांनी रोखलेली पिस्तुल हिसकावून घेत ते पोलिसांना दिले होते. निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यावर कठोर निर्बंध असतानाही ही पिस्तूल घटनास्थळी कशी आली? असा सवाल यावेळी करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरू होता. आता या पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून त्याचे कनेक्शन जम्मू–काश्मीरशी उघड झाले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात ते पिस्तूल जम्मू–कश्मीरमध्ये नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या पिस्तुलचा मालक राजस्थानमधील रहिवाशी असून तो मागील दोन–तीन दिवसांपासून महाडमध्ये उपस्थित होता. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती अथवा तशी पूर्वसूचनाही नव्हती, अशी माहिती महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे.
तसेच पोलिसांनी सर्व संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी सुरू केली असून, निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र मतदानाच्या दिवशीच महाडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला असून, आगामी तपासातून आणि चौकशी कोणती माहिती उघड होते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
FAQs :
1) महाडमध्ये राडा कशामुळे झाला?
नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद झाला आणि तो पुढे हाणामारीत बदलला.
2) विकास गोगावले यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप कोणावर आहे?
सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांवर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
3) पिस्तुल पोलिसांनी कसे मिळवले?
घटनेनंतर ते पिस्तुल पोलिसांकडे स्वेच्छेने जमा करण्यात आले.
4) Jammu–Kashmir कनेक्शन म्हणजे काय?
तपासात पिस्तुलचा उगम किंवा पुरवठा जम्मू-काश्मीरशी संबंधित असल्याचे प्राथमिक धागे मिळाले आहेत.
5) प्रकरणात पुढील तपास काय सुरू आहे?
पोलिस पिस्तुलचा पुरवठा, वापर, आणि कोणाकडे ते आधी होते याचा सखोल तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.