Labor Welfare Distribution Program
Labor Welfare Distribution Programsarkarnama

Raigad Rada : रायगडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेचा वाद बांधकाम मजुरांच्या मुळावर; मिळणाऱ्या लाभाच्या वस्तूही रखडल्या

Ajit Pawars NCP Vs Shivsena : आगामी स्थानिकच्याआधी रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद आणखी वाढला आहे. या वादाचा फटका आता सर्वसामान्य बांधकाम मजुरांना बसताना दिसत आहे.
Published on
Summary
  1. इंदापूर येथे शिवसेनेतर्फे बांधकाम कामगारांसाठी लाभ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  2. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या हस्तक्षेपामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

  3. या घटनेमुळे इंदापूरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महायुतीतील पक्षांनी पक्ष बांधणीत आघाडी घेतली आहे. एकीकडे आगामी स्थानिकची घाई दिसत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद उफाळल्याचे समोर आले आहे. पण आता या वादाचा सर्वसामान्य बांधकाम मजुरांना फटका बसताना दिसत आहे.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद काही क्षमताना दिसत नाही. पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद आता सरकारी कार्यक्रमापर्यंत गेला आहे. यामुळे लाभार्थी असणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांना सकाळी येवूनही मोकळ्या हातानेच घरी परतावे लागले आहे.

शिवसेनेने इंदापूर येथे बांधकाम कारगारांसाठी लाभाच्या वस्तूंच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बांधकाम कामगार विभागाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सकाळ पासून शेकडो लाभार्थी पोहचले होते. मात्र या कार्यक्रमावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अक्षेप घेतला.

Labor Welfare Distribution Program
Shivsena Vs NCP : तळकोकणात सत्तेची थरारक लढत? शिंदेंची शिवसेना विरुद्ध दादांची राष्ट्रवादी, पाच माजी सभापतीही मैदानात

तसेच अधिकाऱ्यांवर मोठा दबाव आणला आणि वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. यामुळे कार्यक्रमाला लाभार्थी उपस्थित असूनही त्यांनी लाभाच्या वस्तू मात्र मिळाल्या नाहीत. तर सकाळी लवकर येऊन देखील मोकळ्या हाताने शेकडो लोकांना परत फिरावे लागले. तर वाटणीला आलेला मनस्ताप वेगळाच. यावरून आता  लाभार्थ्यांनी नाव न घेता संताप व्यक्त केला. सध्या राष्ट्रवादीच्या या दबाव तंत्राची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

यानंतर आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीनेच कार्यक्रमात खोडा घातला असा आरोप शिवसेनेकडून करताना याचा निषेध केला आहे. हा कार्यक्रम रद्द झाल्याने लाभार्थ्यांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागल्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

Labor Welfare Distribution Program
Shivsena vs NCP : महायुतीत भडका, 20-25 गाड्यामधून सिनेस्टाईल एंट्री; संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते महाड शहरात दाखल

FAQs :

1. शिवसेनेचा कोणता कार्यक्रम रद्द करण्यात आला?
शिवसेनेचा बांधकाम कामगारांसाठी लाभ वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

2. हा कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार होता?
हा कार्यक्रम इंदापूर येथे होणार होता.

3. कार्यक्रम रद्द होण्यामागे कोणता पक्ष जबाबदार आहे?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटावर या कार्यक्रमात खोडा घातल्याचा आरोप आहे.

4. या घटनेवर शिवसेनेची प्रतिक्रिया काय आहे?
शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला आहे.

5. या घटनेचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
इंदापूरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com