Raigad Politics; Shivsena MLA Mahendra Thorve, Sunil Tatkre sarkarnama
कोकण

Maharashtra Politics : 'कंपन्यांना राष्ट्रवादीकडून त्रास, तटकरे ब्लॅकमेल करतायेत'; शिंदेंच्या आमदाराच्या खळबजनक आरोपानं राजकारण पुन्हा तापलं

Mahendra Thorve On Sunil Tatkare : गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात महायुतीत खटके उडताना दिसत असून आता पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष नव्या वळणावर पोहचला असून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबजनक आरोप केले आहेत. राष्ट्रवादी खालापूर मधील कंपन्यांना त्रास देत असून तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा रायगडचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पॅचअप झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. एकीकडे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जळवून घेताना दिसत आहेत. पण शिवसेनेचे आमदार मात्र तटकरेंच्या विरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहेत.

काहीच दिवसांपूर्वी आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंच्या विरोधात मोर्चा उघडला होता. यात आता आमदार महेंद्र थोरवेंची देखील भर पडली आहे. गोगावलेंच्या सत्कार कार्यक्रमात डागलेली तोफ त्यांनी शांत केलेली नाही. राष्ट्रवादी रडीचा डाव खेळत असून तटकरेंनी आपली राजकीय ताकद वापरून पालकमंत्रिपद आपल्याचकडे राहावे यासाठी प्रयत्न केले असा आरोप केला होता.

तुम्ही जेष्ठ असून आता तटकरेंना तुम्हीच आवरा अन्यथा आम्ही देखील दळवींच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रम सुरू करू असे आवाहन गोगावलेंना केलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा थोरवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंच्या रोजगार आंदोलनावरून राष्ट्रवादी आणि तटकरेंना लक्ष केलं आहे. तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक आरोप करत निशाणा साधला आहे.

आंदोलनकर्त्यांनी स्वतःची झोळी भरण्यसाठी केलेली ती स्टंटबाजी होती, असा हल्लाबोल करताना हा प्रकार सगळ्यांच्या लवकरच लक्षात येईल. पण ज्या कंपन्या स्थानिकांना रोजगार देण्याचे काम करतात. त्या बंद पाडण्याचा कोण विचार करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशाराही थोरवे यांनी सुधाकर घारे यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT