Raigad Lok Sabha constituency Politics; sunil tatkare, bharat gogawale And vikas gogawale sarkarnama
कोकण

raigad politics : दोन वर्षांपूर्वी पोस्टर्स लागले, यंदा थेट दंडच थोपाटले; भरत गोगावलेंच्या मुलाचा तटकरेंच्या मतदारसंघावर दावा

Vikas Gogawale On Raigad Lok Sabha constituency : राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळणार अशी खात्री असलेल्या भरत गोगावलेंना ते अद्याप मिळालेलं नाही.

Aslam Shanedivan

  1. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे.

  2. विकास गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवत सुनील तटकरे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.

  3. पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजीचे राजकारण आता लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

shivsena vs ncp conflict raigad politics : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद अद्याप थांबलेला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अद्याप राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीला चार वर्षे बाकी असतानाच महायुतीत वादाची वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी थेट लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असतानाही पालकमंत्रिपद वडील भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळत नसल्याने आता त्यांनी लोकसभेच्या जागेवरच दावा केला आहे. तर थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील महायुतीमध्ये विविध कारणांनी वाद समोर येत असतानाच रायगडमध्येही नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगडमध्ये सध्या दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार आहेत. यामुळे या जागेवर आधीच राष्ट्रवादीचा दावा आहे. यामुळे आगामी २०२९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी येथे राष्ट्रवादीचाच दावा असेल यात शंका नाही.

पण तरिही शिवसेनेकडून आपण मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दिले आहेत. त्यांनीच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, याआधी पक्षाचे प्रमुख शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही तटकरे यांना निवडूण दिले.

मात्र आता २०२९ मध्ये आपण स्वत: इच्छुक आहोत. पक्षाने आदेश दिल्यास मैदानात उतरू. दरम्यान आता गेल्या अनेक वर्षांपासून रायगडची ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने शिवसेनेकडून यावर दावा करण्यात आले आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उदान आले आहे.

नेमंक काय म्हणावे विकास गोगावले?

राजकारणात नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. आमचं पक्ष नेतृत्व हे शिंदे साहेब आहेत. ते जो निर्णय देतील तो पाळणारा मी कार्यकर्ता आहे. २०२४ साली शिंदे साहेबांनी मला सांगितले की आपल्याला पूर्ण ताकदीने तटकरे यांना निवडून द्यायचे आहे. त्या पद्धतीने युती म्हणून आम्ही त्यांना निवडून दिले. आता भविष्यात बघू, काय होतं आणि काय नाही. तरर पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल.

दरम्यान २०२४ मध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटपावरून असाच सुप्त वाद महायुतीत दिसला होता. तेव्हा देखील रायगडमध्ये रायगडमध्ये लोकसभेचे उमेदवार होते. तर शिवसेनेकडून अनंत गिते मैदानात उतरतील अशी शक्यता होती. तोच गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर्स झळकले होते.

आमदार गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे 'भावी खासदार' अशा आशयाचे पोस्टर्स झळकले होते. यामुळे तर त्यावेळी मंत्रीपद न मिळालेल्या गोगावलेंनी आता लोकसभेच्या जागेवर दावा केल्याची चर्चा रंगली होती. तर आता वडीलांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळत नसल्यानेच त्यांनी लोकसभेच्या जागेवरच दावा केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

FAQs :

1. रायगडमध्ये नेमका वाद कशामुळे सुरू झाला?
पालकमंत्री पदावरून नाराजी आणि लोकसभा निवडणुकीच्या दाव्यामुळे हा वाद उफाळला.

2. विकास गोगावले कोण आहेत?
ते शिवसेना नेते भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत.

3. सुनील तटकरे यांची भूमिका काय आहे?
ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार आहेत.

4. हा वाद महायुतीवर परिणाम करेल का?
होय, महायुतीतील अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता आहे.

5. लोकसभा निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT