NCP MP Sunil Tatkare may ally with Shetkari Kamgar Paksha in Raigad Sarkarnama
कोकण

Raigad Politics : रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; 'गोगावलेंना' शांत बसवण्यासाठी तटकरेंची जुन्या मित्राला साद?

Raigad Politics : रायगड जिल्ह्यामध्ये मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेसोबतचा वाद वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत युती करण्याचा विचार सुरु केला आहे.

Hrishikesh Nalagune

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे वाद सुरु आहेत. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युतीमध्ये राष्ट्रवादी नकोच अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या भूमिकेला शह देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावपेच आखले जात आहेत. खासदार सुनील तटकरे शेतकरी कामगार पक्षाला साद घातली जाण्याची दाट शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. गोगावले यांना जिल्ह्यातील आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचीही साथ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघेही महायुतीचे घटक पक्ष असले तरी आता त्यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे.

यातूनच शिवसेनेने स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीविरहित आघाडी व्हावी अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र येतील ही शक्यता दुरापास्तच आहे. यामुळेच उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शेकापसमवेत आघाडी केली जावी यावर गांभीर्याने विचार सुरु आहे.

स्थानिक पातळीवर आघाडी, युतीचे कोणतेही बंधन ठेवले जात नाही. अनेकदा परस्पर विरोधकही एकत्र आल्याचे दिसून आलेले आहे. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूरमधील मौदा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते.

रायगडच्या राजकारणातही राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष हे कधीकाळी एकमेकांचे मित्र होते. मात्र मधल्या काळात दोन्ही पक्षांमध्ये अंतर पडले. आता तर शेकाप अस्तित्वासाठीच झगडत आहे. अशावेळी पुन्हा सत्तेच्या प्रवाहात कार्यरत रहायचे असेल तर कुणाचा तरी आधार घेणे शेकापला गरजेचे आहे.

शेतकरी कामगार पक्ष सध्या महाविकास आघाडीचा भाग आहे. पण महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अस्तित्वच नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पुन्हा हातमिळवणी करताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT